नांदेड- येथील पत्रकार तथा ग्रामीण कथाकार राम तरटे यांना संविधान जागर पुरस्कार जाहिर झाला आहे. येत्या 4 मार्च रोजी मान्यवरांच्या हस्ते नांदेड येथे त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
बुद्धीस्ट रिसर्च फाऊंडेशन नांदेडच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतीय संविधान अमृत महोत्सवानिमित्त नांदेड जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना संविधान जागर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. गत दिड दशकापासून वृत्तपत्र क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल पत्रकार राम तरटे यांना संविधान जागर- 2025 हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. कुसूम सभागृहात दि. 4 मार्च रोजी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असून मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्तींना गौरविण्यात येणार आहे.