नांदेड(प्रतिनिधी)-युटूबवर बातम्या टाकून बदनामी करतो एवढेच नव्हे तर फिर्यादीच्या खिशातील 3 हजार रुपये बळजबरीने काढून घेणाऱ्या पत्रकार याहिया खान, त्याचा मुलगा आणि इतर दोघांविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जबरी चोरी, खंडणी मागणे आदी सदरांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल होवू नये म्हणून समाजाला नेहमी त्रास देणाऱ्या काही व्यक्तींनी प्र्रशासनावर दबाव पण आणला होता. पण प्रशासनाने तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
जुबेर अहेमद जहुर अहेमद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते मफ्को रोड येथे राहतात. दि.24 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास एस.के.स्टील, चंदासिंग कॉर्नर येथे मी व माझे वडील जहुर अहेमद दुकानावर असतांना जहिर सय्यद युसूफ आणि शेख अजहर शेख याहिया हे दोघे एका दुचाकीवर बसून आले आणि आमच्या दुकानासमोर दुचाकी उभी करून माझ्या दुकानाची व्हिडीओ शुटींग करत होते. तेंव्हा मी त्यांना विचारणी केली. शेख अजहर म्हणाला माझे वडील याहिया पत्रकार आहेत. त्यांनी मला तुझ्या दुकानाची शुटींग घेण्यासाठी पाठविले आहे असे म्हणाला. मी त्याला शुटींग घेण्यापासून रोखले असतांना दुसऱ्या एका दुचाकीवर यासीन सय्यद युसूफ आणि पत्रकार याहिया हे दोघे आले. तेंव्हा याहिया पत्रकाराने मला सांगितले की, येथे तुझा व्यापार चांगला चालू आहे. या व्यापाराच्या जोरावर तु खुप पैसा कमवत आहेस तेंव्हा आम्हाला 50 हजार रुपये दे नसता युट्युबवर बातमी टाकून तुझी बदनामी करील अशी धमकी देत माझे वडील जहुर अहेमद आणि कामगार मोहम्मद फय्याज व शेख अजहरोद्दीन असे दुकानाबाहेर आले तेंव्हा त्यांनी मला व माझ्या वडीलांना शिवीगाळ केली व लाथाबुक्यांनी मारहाण केली. याहियाने मला पकडून ठेवले आणि यासीन सय्यद युसूफने माझ्या शर्टच्या खिशात असलेले 3 हजार रुपये बळजबरीने काढून घेतले आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी या तक्रारीवरुन भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(4), 308(2), 115(2), 352, 351(3) आणि 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 188/2025 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे. या हा गुन्हा दाखल होवू नये म्हणून काही समाजकंठकांनी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण पोलीस प्रशासन प्रमुख अबिनाशकुमार हे खंबीर असल्याने हा गुन्हा दाखल झाला.
पत्रकार याहिया, त्याचा पूत्र आणि इतर दोघांवर जबरीचोरी, खंडणी आदी सदरांखाली गुन्हा दाखल
