नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या घरी कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या व्यक्तींचे घरफोडून चोरट्यांनी 5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार जुना कौठा भागात घडला आहे. शहरातील सराफा भागातून एका सराफ व्यापाऱ्याची नजर चुकवून 2 लाख 25 हजार रुपयांचा दागिणे लांबविण्यात आले आहेत.
जुना कौठा भागातील गिरीश सत्यनारायण कासट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 फेबु्रवारी रोजी ते आपल्या आई-वडीलांसह घराला कुलूप लावून आदिलाबाद येथे आपल्या नातलगांकडे गेले होते. 23 फेबु्रवारी रोजी सकाळी 8.30 वाजता त्यांना घर फोडल्याची माहिती मिळाली. तपासणी केली असता घराचा मुख्य दरवाजा आणि इतर दवाज्यांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील अलमारीचे लॉक तोडले आणि 1 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिणे मिळून एकूण 5 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 186/2025 नुसार दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक मठवाड अधिक तपास करीत आहेत.
श्रीनिवास भगवानदास बांगड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 फेबु्रवारीच्या दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्यांची सराफा दुकान जयसचिसाय माता ज्वेलर्स येथे सोन्याची खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या एका चोरट्याने त्यांची नजर चुकवून 2 लाख 25 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहे. इतवारा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 79/2025 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस अंमलदार मोहन हाके अधिक तपास करीत आहेत.
जुना कौठा येथे घरफोड; सराफा दुकानात चोरी; सव्वा सात लाख रुपयांचा ऐवज लंपास
