खून प्रकरणातील फरार आरोपीकडे सापडला गांजा

नांदेड(प्रतिनिधी)-नोव्हेंबर 2024 मध्ये एका व्यक्तीचा खून करून आजपर्यंत फरार असलेल्या एका गुन्हेगाराला स्थानिक गुन्हा शाखेने शोधल्यानंतर त्याच्याकडून 1 किलो 400 ग्रॅम गांजा हा अंमलीपदार्थ सुध्दा जप्ती करण्यात आला आहे.
दि.24-25 नोव्हेंबर 2024 च्या रात्री हरप्रितसिंघ उर्फ हॅप्पी कुलवंतसिंघ चाहेल आणि त्याचा मेहुणा ईश्र्वरसिंघ जसवंतसिंघ गिरणीवाले या दोघांनी संगणमत करून तेजपालसिंघ उर्फ तेजूसिंग उर्फ तेजा बांगा कुलवंतसिंघ चाहेल (38) रा.कौठा ता.जि.नांदेड यास त्रिकुट शिवारात नेऊन काठीने, बेलटने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले. ज्यामुळे त्याचा जिवगेला होता. या संदर्भाने बारड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 107/2024 दाखल होता. त्या प्रकणात संतोष लक्ष्मण करणेवाड (30) रा.वसंतानगर, नुरीचौक जवळ नांदेड हा सुध्दा पोलीसांना हवा होता.
पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक बळीराम दासरे, पोलीस अंमलदार सुरेश घुगे, मिलिंद नरबाग, बालाजी यादगिरवाड, मारोती मुंडे, सुधाकर देवकते आणि सायबर सेल येथील राजू सिटीकर आणि दिपक ओढणे यांनी संतोष लक्ष्मण करणेवाडचा शोध घेवून नुरी चौकात अटक केली. त्याच्याजवळ एक चार चाकी वाहन एम.एच.29 ए.आर.3142 आणि त्या चार चाकी वाहनात 1.400 किलो गांजा असा एकूण 5 लाख 31 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या संदर्भाने विमानतळ पोलीस ठाण्यात रवि वाहुळे यांच्या तक्रारीवरुन अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याप्र्रमाणे गुन्हा क्रमांक 66/2025 दाखल करण्यात आला आहे.
तिघांवर मेहरबानी का?
या संदर्भाची प्रेसनोट जारी करतांना पोलीस विभागाने रिंदा पथकात कार्यरत असणारा पोलीस अंमलदार तानाजी येळगे, देविदास चव्हाण आणि मोतीराम पवार या तिघांची नावे आहेत. या तिघांपैकी देविदास चव्हाण आणि मोतीराम पवार या दोघांची नियुक्ती एटीबी या विभागात आहे. हा विभाग अतिरेकी कार्यवाह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आहे. तसेच तानाजी येळगे या पोलीस अंमलदाराची नियुक्ती रिंदा पथकात आहे. 10 फेबु्रवारी रोजी नांदेडमध्ये घडलेल्या गोळीबार प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरिक्षक चंद्र किशोर मिणा यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्रातील सहा पोलीस अंमलदारांना आपल्या विभागात मदतीनस म्हणून बोलवले. कारण 10 फेबु्रवारीचा गोळीबार अतिरेकी रिंदाच्या सांगण्यावरून झाला हे आता स्प्ष्ट झाले आहे. तो गुन्हा तपासासाठी दहशतवाद विरोधी पथकाकडे असला तरी नांदेड पोलीस अधिक्षक कार्यालयातील एटीबी विभागाचे प्रमुख पोलीस निरिक्षक जयप्रकाश गुट्टे आणि त्यांचे इतर पोलीस सहकारी दहशतवाद विरोधी पथकाला मदतच करत आहेत. परंतू या तिघांना त्या कामासाठी का पाठविले नाही. हा प्रश्न या प्रेसनोटच्या माध्यमातून उपस्थित होते आहे.या तिघांवर मेहरबानी करण्याच्या संदर्भाने अनेक प्रकारच्या चर्चा पोलीस दलातून ऐकावयास मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!