नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नांदेड शहराध्यक्षपदी दैनिक नांदेड टाइम्सचे संपादक मुनतजीबोद्दिन यांची रविवारी दि २३ रोजी नियुक्ती करण्यात आली असून येत्या काळात नांदेड शहरात कार्यकरणीचा विस्तार करण्यास येणार आहे.
नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत संघटनेच्या विस्तारासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीत सविस्तर चर्चा करुन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे यांच्या सुचनेनुसार व प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांच्या संमतीने नांदेड शहराध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ अभयकुमार दांडगे, जिल्हाध्यक्ष संग्राम मोरे, ग्रामीण अध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे, अर्धापूर तालुका अध्यक्ष गुणवंत विरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.येणाऱ्या काळात नांदेड शहरासह जिल्ह्यात संघटनेचे सदस्य नोंदणी अभियान व संघटनेच्या विस्तारासाठी प्रयत्न करा असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष डॉ अभयकुमार दांडगे यांनी केले.