कोण आहे मग गद्दार ;भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अहवालात युएसएआयडीने पैसे दिल्याचा अहवाल

युएसएआयडीकडून आलेल्या पैशांबाबत भारतीय जनता पार्टी विरोधकांना आक्षेप घेत असतांना भारताच्या वित्त मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार सन 2023-24 मध्ये भारतात युएसएआयडीने 97 मिलियन डॉलर अर्थात 825 कोटी रुपये पाठविले आहेत. एकूण 750 मिलियन डालरचे 7 प्रकल्प युएसएआयडीच्या मदतीने सुरू होणार असल्याची माहिती सुध्दा या अहवालात आहे. गोदी मिडियाचे पत्रकार नरेंद्र मोदी बदला घेणार अशा बातम्या दाखवत आहेत. खरे तर बदला आता वित्त मंत्रालयाकडून घ्यावा लागेल. चुकीच्या माहितीवर आधारीत आपल्या प्रतिक्रिया आपल्याला कशा घातक ठरतात. हे या घटनेवरून दिसून येते. कारण युएसएआयडीच्या पैशांची माहिती सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या व्हाटसऍप कुलगुरू अमित मालविय यांनी प्रसारीत केली होती आणि त्यानंतरच विरोधकांवर आरोप करत भारतीय जनता पार्टी, त्यांचा मिडीया ओरड करू लागला होता. तसेच विदेशमंत्री एस.जयशंकर सुध्दा युएसएआयडीच्या पैशांविरुध्द बोलत होते. मुळात हा प्रकार एलोन मस्कच्या शब्दांच्या गोंधळामुळे घडलेला आहे.
भारतात 21 मिलियन डॉलर आम्ही प्रस्तावित केलेली रक्कम आम्ही कमी करणार आहोत. जी रक्कम भारतात निवडणुक टक्का वाढविण्यासाठी दिली होती. असा प्रचार सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांच्या खास मर्जितील जिओजी विभागाचे प्रमुख एलोन मस्क यांनी केली होती. त्या घटनेला दुजोरा देत डोनॉड ट्रम्प यांनी सुध्दा हे पैसे आम्ही कमी करणार आहोत असे सांगितले. त्यानंतर मात्र अमेरिकेच्या असे लक्षात आले की, बांग्लादेश हे नाव सांगण्याऐवजी भारत सांगितले. तेंव्हा डोनॉल्ड ट्रम्प यांनी माझे मित्र नरेंद्र मोदी यांना 21 मिलियन डॉलर देणार असे सुध्दा पत्रकार परिषदेत सांगितले. अशिक्षित माणसासारखे पहिल्याच घटनेवर भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा मिडीया ओरड करू लागला. एवढेच नव्हे तर विदेश मंत्री एस.जयशंकर सुध्दा भारतात येणारा पैसा म्हणजे भारताच्या अंतर्गत कामांमध्ये ढवळा ढवळ आहे असे सांगितले. परंतू काही जागरुक पत्रकारांनी याचा माग काढला. तेंव्हा भारताच्या वित्त मंत्रालयातील आर्थिक व्यवहार शाखेच्या अहवालामध्ये भारतात 825 कोटी रुपयांची 7 प्रकल्प कामे युएसएआयडीच्या पैशातून सुरू होणार आहेत असे दाखवले. म्हणजे गोदी मिडीया ज्या प्रमाणे सांगत होता की, नरेंद्र मोदी आता चुकीच्या पैशांचा वापर करणाऱ्या गद्दारांना शोधणार ही बाब मागे पडली. कारण आता शासनाच्या अभिलेखातच असे आहे तर गद्दार कोण? शासनच. हे पैसे कॉंग्रेससाठी आले, कॉंगे्रस त्या पैशांचा उपयोग करून नरेंद्र मोदींना त्रास देणार अशा चर्चांना आपोआपच पुर्ण विराम लागला आणि केंद्र सरकार स्वत:च खोटे ठरले. बहुतेक अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांना माहित नाही भारतात निवडणुक जिंकण्यासाठी भारत सरकारकडे राजीवकुमारसारखे मुख्य निवडणुक आयुक्त आहेत. त्यासाठी पैशांची गरज नाही.
यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु ते आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व पंतप्रधानांच्या कालखंडात युएसएआयडीने 555 प्रकल्पांसाठी एकूण 1700 कोटी रुपये दिले आहेत. त्यात सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये कृषी, खाद्य, पाणी, स्वच्छता, उर्जा आणि आपत्ती व्यवस्थापन या प्रकल्पांचा समावेश आहे. मग पैसे तर शासनच घेत आहे आणि आरोप विरोध पक्ष नेते खा.राहुल गांधी यांच्यावर.सन 2023-24 मध्ये 825 कोटी रुपये आले आहेत आणि पुढे 65 अब्ज डॉलर येणार आहेत. याची माहिती सुध्दा वित्त मंत्रालयाच्या अहवालातून समोर आली. भारताचा वापर डोनॉल्ड ट्रम्प हे एक मनोरंजनाचे साधन म्हणून करतात असेच आता म्हणावे लागेल आणि त्यांच्या मनोरंजनात आपला सहभाग दाखविण्यासाठी भारतीय जनता पार्टीची मंडळी कठपुतळ्यांसारखी त्यांनी हलविलेल्या दौऱ्यांवर प्रदर्शन करत राहते ही आहे भारतातची समृध्द लोकशाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!