जेष्ठ पत्रकार रमेश गंगासागरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राज्यस्त्रीय पुरस्काराने सन्मानित 

 

आदिलाबाद (प्रतिनिधी)  -संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 648 वी जयंती तेलंगानातील आदिलाबाद येथे रविवार दि.23 फेब्रुवारी रोजी मोठया हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली. या जयंती मध्ये जयंती मंडळाच्या वतीने तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्यात सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या तेलंगानातील मान्यवरासह नांदेड व नांदेड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचा l तेलंगणा सरकारचे माजी मंत्री श्री जोगू रामन्नाजी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्र मधून नांदेड येथिल इंजी. तथा साहित्यिक भा. गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर, भोकर येथिल जेष्ठ पत्रकार तथा अ.भा. गुरु रविदास समता परिषदेचे ता. अध्यक्ष रमेश जी. गंगासागरे, अर्धापूर येथिल पत्रकार सोनटक्के यांचा समावेश आहे.

अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळ मौलिक अधिकार समाजसेवा मंडळ आदिलाबाद तेलंगाना यांच्या वतीने रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी आदिलाबाद येथील गुरु रविदास समाज मंदिरामध्ये राष्ट्रीय गुरु रविदास फेस्टिवल 2025 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मधु बावलकर जेष्ठ कवी साहित्यिक तथा अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाचे उपाध्यक्ष हे होते, तर प्रमुख आणि विशेष अतिथी म्हणून तेलंगणा सरकारचे माजी मंत्री श्री जोगू रामन्नाजी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळ मौलिक अधिकार समाजसेवा मंडळ आदिलाबाद तेलंगाना यांच्या वतीने देण्यात आलेल्या पुरस्कारामध्ये मधू बावलकर यांनी म्हटले आहे की, आपण सामाजिक मूल्यांची जोपासना करणारे आहात समाजात आपली भूमिका ही दीपस्तंभ प्रमाणे प्रेरणादायी अशीच आहे आपल्या सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय गुरु रविदास फेस्टिवल 2025 मध्ये आपणास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज रत्न राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असल्याचे आहे. ह्या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, मानचिन्ह शॉल, आणि पुष्प हार असे असून, हा पुरस्कार मिळाल्यामुळे ज्येष्ठ पत्रकार रमेश गंगासागरे यांनी म्हटले आहे की, समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीत यापुढे सुद्धा मी लेखणी द्वारे आवाज उठवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे, तसेच समाजाची यापुढेही आणखीन मोठ्या हर्ष उल्हासामध्ये समाजसेवा करणार असून समाजासाठी आणखीन जास्तीचा वेळ देणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!