गुरुद्वारा परिसरात गेट क्र 6 समोर झालेल्या गोळीबार प्रकरणासाठी परिक्षेत्रातील सहा पोलीस अधिक्षकाऱ्यांना बोलावले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील एकूण 5 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि एक पोलीस उप निरिक्षक अशा सहा अधिकाऱ्यांना दहशतवाद विरोधी पथकात पाठविण्याचे पत्र दहशतवाद विरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरिक्षक चंद्र किशोर मिणा यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरिक्षकांना पाठविले आहे.
नांदेड शहरात 10 फेबु्रवारी रोजी घडलेल्या गोळीबार प्रकरणाचा गुन्हा क्रमांक 62/2025 हा पुढील तपासासाठी दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला. मुंबई येथील काळा चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 2/2025 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सध्या सहाय्यक पोलीस उपआयुक्त दहशतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे देण्यात आला आहे.
दहशतवाद विरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरिक्षक चंद्र किशोर मिणा यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांना पाठविलेल्या पत्रात या गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांच्या परिक्षेत्रातील सात अधिकारी पाठविण्यात यावेत असे या पत्रात नमुद आहे. हिंगोली जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शंकरराव शेकडे (पोलीस ठाणे वसमत शहर), नांदेड जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पंडीतराव पवार (पोलीस ठाणे उस्माननगर), नांदेड जिल्ह्यातील रवि वैजनाथ वाहुळे (नियंत्रण कक्ष), पांडूरंग व्यंकटी माने (पोलीस ठाणे सोनखेड), परभणी जिल्ह्यातील पांडूरंग दिगंबर भारती (स्थानिक गुन्हे शाखा परभणी) आणि परभणी येथील पोलीस उपनिरिक्षक दशरथ अंकुश आडे (विशेष पथक परभणी) असे हे अधिकारी आहेत. पण वृत्तलिहिपर्यंत कोणता अधिकारी हजर झाला आणि कोणता नाही याचा काही थांगपत्ता लागला नाही.
नांदेड जिल्ह्यातील उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांची बदली झाल्यानंतर सुध्दा आणि आता दहशतवाद विरोधी पथकात बोलावल्यावर सुध्दा नदी पलिकडच्या कार्यालयामुळे सोडले जात नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये पत्रपंडीताचा सुध्दा सहभाग असल्याची खात्रीलायक माहिती आहे. नांदेड शहरात, जिल्ह्यात असंख्य पत्र पंडीत आहेत. सर्वांचेच ऐकायला हवे मग. कारण एकच पत्रपंडीत लाडका असू शकत नाही. याचे भान नसावे हे दुर्देव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!