नांदेड (प्रतिनिधी)- शहराच्या सुमेधनगर येथील एका 28 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
भाग्यनगर हद्दीतील सुमेधनगर येथील युवक नितीन उत्तमराव ढोले (28) या युवकाने दि. 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान आपल्या राहत्या घरी (सुमेधनगर) येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केल्याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू होती.