नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड तालुक्यातील रहाटी या वाळू घाटावरून बेकायदेशीर भरून जाणाऱ्या तीन टिपर आणि तीन हायवा गाड्या जनतेने पकडल्या आहेत असे सांगितले जात आहे. त्या संदर्भाने पोलीस ठाणे लिंबगाव येथे या 91 लाख 5 हजार रुपये किंमतीच्या सहा गाड्या जप्त करण्यात आल्या असून 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व गाड्या आपल्या जिल्ह्यातील वाळू वसमतकडे नेतात असा गावकऱ्यांचा आरोप आहे.
लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मुंजाजी दळवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 फेबु्रवारीला रात्री 11 ते 11.30 वाजेदरम्यान त्यांनी रहाटी या गावातून येणारे तीन टिप्पर आणि तीन हायवा गाड्या पकडल्या. त्यातील टिपपरचे क्रमांक एम.एच.14 बी.जे.964, एम.एच.43 यु.6109, एम.एच.14 बी.जे.1637 असे आहेत. तसेच हायवा गाड्यांचे क्रमांक एम.एच.29 एम.747, एम.एच.38 एक्स.0007 आणि एम.एच.26 सी.एम.320 असे आहे. या सर्व गाड्यांमध्ये 21 ब्रास वाळू भरलेली होती. या मुद्देमालाची किंमत 91 लाख 5 हजार रुपये आहे. ही कार्यवाही करतांना मंडळाधिकारी जगताप, तठाली विजय रणविरकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक मुंजाजी दळवे आणि पोलीस अंमलदार भुवार हे हजर होते. सहा गाड्यांचे मालक आणि चालक अशा 12 लोकांविरुध्द लिंबगाव पोलीसांनी गुन्हा क्रमांक 14/2025 दाखल केला आहे.
या गाड्यांचे नंबर, त्यांचे विमा, त्यांचे फिटनेस आहेत की, नाही याबद्दलची माहिती प्राप्त झाली नाही. येथील गावकरी सांगतात की, या सर्व गाड्या वसमत तालुक्यात जातात आणि आम्ही पकडल्या आहेत. तरी गुन्हा दाखल झाला हे सुध्दा सत्य आहे.
लिंबगाव पोलीसांनी अवैध वाळू वाहणाऱ्या तीन टिप्पर आणि तीन हायवा पकडले
