नांदेड जिल्ह्याचे 18 पोलीस अंमलदार झाले पोलीस उपनिरिक्षक

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर नांदेड जिल्ह्यातील 18 पोलीस अंमलदार पदोन्नती मिळाल्यानंतर आज पोलीस उपनिरिक्षकाचा गणवेश परिधान करून पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्यासमक्ष हजर झाले. 18 जणांमधील एक अंमलदाराला हिंगोली जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली आहे आणि इतर 17 जण नांदेड जिल्ह्यात आले आहेत.
पोलीस अंमलदारांना पदोन्नती मिळण्यासाठीचा लढा भरपूर दिवस चालला होता. त्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयाने अनेक टप्यांमध्ये त्या पदोन्नत्या देणे सुरूवात केली. त्यातील पोलीस अर्हता परिक्षा उत्तीर्ण झालेल्या पैकी काही पोलीस अंमलदारांना 10 फेबु्रवारी रोजी पदोन्नती देण्यात आली होती. त्यात नांदेड जिल्ह्यातील 18 पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. 18 पैकी चांदराव मारोतराव साखरे यांना आज हिंगोली जिल्ह्यात बदली देण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात बदली मिळालेल्या 17 जणांची नावे पुढील प्रमाणे आहेत. गजेंद्र गोेविंदराव मांजरमकर, चंद्रकांत गंगाधरराव पांचाळ, विठ्ठल काशीनाथराव दावलबाजे, संजय नन्हु मुंडे, प्रल्हाद संभाजी हैबतकर, शेषराव विठ्ठलराव यनगंटे, अशोक किशन बनसोडे, अजय कुलभुषण साकळे, सोमनाथ गंगाधरअप्पा स्वामी, उत्तम किशनराव गुट्टे, संभाजी विठ्ठलराव हनवते, बसवंत बागन्ना मुत्तेपोड, गंगाधर लालू गायकवाड, दत्ता तुकाराम वाणी, सय्यद अहमद साब सय्यद मोईयोद्दीन सय्यद, कृष्णा जगदीश सुर्यवंशी आणि परमेश्र्वर भाऊराव सूर्यवंशी. या सर्व पोलीस अंमलदारांना नांदेड पोलीस परिक्षेत्रात पोलीस उपनिरिक्षक या पदावर हजर करून घेतल्यानंतर पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी त्यांना उत्कृष्ट काम करून पोलीस दलाचे नाव उज्वल करावे अशा शुभकामना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!