नांदेड(प्रतिनिधी)-शहरात व्यापाऱ्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखुन त्यावर अंमलबजावणी करू असे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी व्यापारी आणि व्यावसायीकांच्या बैठकीत आश्वासन दिले.
20 फेबु्रवारी रोजी पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयात शहरातील व्यापारी आणि व्यावसायीकांची बैठक पार पडली. त्यात जवळपास विविध संघटनांचे 50 प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत व्यापारी, व्यावसायीकांनी आपल्या समस्या पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्यासमक्ष मांडल्या. त्यात रस्त्याची कामे, अतिक्रमणे, फेरीवाले, गुन्हेगारी या संदर्भाने आप-आपले विचार जनतेतून समोर आले.
या प्रसंगी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी या समस्यांच्या संदर्भाने कालबध्द कार्यक्रम आखुन त्यावर अंमल करू या. रहदारी समस्यांसाठी 5 मार्च पासून व्यापक मोहिम पोलीस विभागाकडून राबविण्यात येईल असे सांगण्यात आले. या बैठकीत पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार हेही उपस्थिती होते. तिन महिन्यानंतर अशीच बैठक आयोजित करून झालेल्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे अवलोकन करण्यात येईल असेही सांगण्यात आले.
व्यावसायीकांसाठी कालबध्द कार्यक्रम-शहाजी उमाप
