नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक यांना चक्क पोलीस उपनिरिक्षक केले आहे. आता पुढे कोणाचा तरी गळा कापून आपले हात झटक्याचा हा प्रकार असेल. स्वाक्षरी करतांना त्यांनी या बिनतारी संदेशातील मजकुर वाचलाच नाही हे सिध्द झाले.
नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक पदावर शहाजी उमाप हे विराजमान आहेत. त्यांनी मागील महिन्यामध्ये नांदेड जिल्ह्याची वार्षिक तपासणी केली आणि काही पोलीस ठाण्यांमध्ये भेटी दिल्या. त्यादरम्यान त्यांना आढळेल्या भाग 1 ते 5 चे गुन्हे, भाग 6 चे गुन्हे, दारु बंदी, जुगार, आकस्मात मृत्यू अशा गुन्ह्याचा प्रलंबित कालावधी मोठा होता. त्याअनुशंगाने पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी 20 फेबु्रवारी रोजी एक बिनतारी संदेश जारी केला. हा बिनतारी संदेश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांसाठी आहे. त्यामध्ये मा.पोलीस उपनिरिक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड यांच्या तपासणीनंतर प्रलंबित राहिलेल्या गुन्ह्यांची निर्गती करण्यासाठी दि.21 फेबु्रवारी ते 28 फेबु्रवारी दरम्यान विशेष मोहिम राबवून ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांनी गुन्हे निर्गतीचा अहवाल ईमेलद्वारे पोलीस अधिक्षक कार्यालयास पाठवावा असे लिहिले आहे. या बिनतारी संदेशावर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांची स्वाक्षरी आहे. पण आता ही बाब प्रसिध्द झाल्यानंतर कोणा तरी छोट्याशा पदाच्या व्यक्तीच्या गळ्यावर धार ठेवून हे प्रकरण समाप्त होईल. परंतू शासकीय कामकाजाच्या एसओपीप्रमाणे कनिष्ठांच्या चुका दुरुस्त करून आपल्या कार्यालयाची कार्यप्रगती सक्षम करणे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काम असते. पण असे होईल काय? या प्रश्नाचे उत्तर लिहिणे अवघड आहे.
शहाजी उमाप यांना करण्यात आले पोलीस उपनिरिक्षक
