नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथे हॉटेलमध्ये का करणाऱ्या परप्रांतीय कामगारांचे पैसे घेवून परप्रांत हरीयाना येथील एक जण पळून गेला आहे.
तेलंगणा राज्यातील जीवन ज्योती प्रसन्नकुमार जेना यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 फेबु्रवारी 2025 रोजी त्यांनी आणि इतर 12 कामगारांनी मिळून हरीयाना राज्यातील कुशल युगलपाल या व्यक्तीला 1 लाख 93 हजार 500 रुपये बॅंकेत जमा करण्यासाठी दिले. परंतू कुशल युगलपालने सर्वांचा विश्र्वासघात करून ते पैसे बॅंकेत जमा न करता पैसे घेवून पळून गेला आहे. विमानतळ पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 62/2025 नुसार दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक साखरे अधिक तपास करीत आहेत.
कामगारांचे 1 लाख 93 हजार 500 रुपये घेवून भामटा फरार
