अर्धापूर (प्रतिनिधि) – तालुक्यातील लोणी बु. येथील धडाडीचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते गंगाधर घन:श्याम सोनटक्के यांना तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
गुरु रविदास समाजसेवा मंडल आदिलाबादच्या वतीने गुरु रविदास जयंतीनिमित्त रविवार दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय गुरु रविदास फेस्टिव्हल २०२५ चे आयोजन गुरु रविदास मंदिर, चिलकुरी लक्ष्मीनगर, आदिलाबाद येथे आयोजन करण्यात आले असून त्यात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या फेस्टिव्हलचे उदघाटन सतनामसिंघ सोखी यांच्या हस्ते होणार असून सुप्रसिद्ध साहित्यिक मधू बावलकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. माजी मंत्री जोगू रामन्ना, आ. पायल शंकरजी, कंदी श्रीनिवास रेड्डी आदींची प्रमुख उपस्थिती यावेळेस राहणार आहे.
पत्रकार गंगाधर सोनटक्के यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा प्रतिष्ठेचा समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.