नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमध्ये सुरू होणाऱ्या खेळ स्पर्धांच्या कार्यक्रमाअगोदरच एका प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या शेजारी राहणाऱ्या कोळसा खाणी असणाऱ्या पत्रकाराने पाकीटे वाटली आहेत. पाकीट वाटल्यामुळेच बातम्या छापल्या जातात, दाखवल्या जातात. हा अत्यंत मोठा गैरसमज सर्वत्र पसरला आहे. आज दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मोत्सव दिन आहे आणि आजच्या दिवशी हा प्रकार उघडकीस आला हे पत्रकारीतेसाठी किती दुर्देव आहे.
पत्रकारांना काय-काय द्यावे लागते हे आता सर्वश्रुत झाले आहे. काही पत्रकार राजकीय नेत्यांचे हस्तक आहेत, काही पत्रकार प्रशासनिक अधिकाऱ्यांचे हस्तक आहेत आणि या हस्तकांमुळे खऱ्या पत्रकारांवर नेहमीच अन्याय होतो. अनेकवेळस अशा पत्रकारांमुळेच प्रशासकीय अधिकारी खऱ्या पत्रकारांना तुम्ही पित्त पत्रकारीता करता असे बोलतात. कारण तो अधिकारी आरशात दाखवला जातो तोच चेहरा पाहतो खरा चेहरा ओळखण्याची ताकतच त्यात नसते. त्यामुळे तो दाखवलेल्या आरशातील चेहऱ्यालाच खरा चेहरा समजतात.
नांदेडमध्ये खेळ स्पर्धा पार पडणार आहेत. यासाठी कालपासूनच पॉकिटे वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला. ज्यामध्ये काही मर्जीतील पत्रकारांना पाकिटे मिळाले, मर्जीतील काहींना आज मिळतील.काहींना वगळले जाईल असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मर्जी कोण ठरवते. हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मर्जी ठरली तरी बातम्या कोण लिहिते, कोण दाखवते याची ओळख अधिकाऱ्यांनी कधीच करून घेतलेली नाही.
नांदेडमध्ये एकाच इमारतीत राहणारा अधिकारी आणि कोळसा खाणींचा मालक पत्रकार या दोघांनी मिळून हा पाकिटे वाटपाचा कार्यक्रम सुरू केला आहे. असे सांगतात नुतन अधिकाऱ्यांमुळे हा खेळ केला असावा कारण पत्रकारांची त्यांची ओळख नाही.या पुर्वी झालेल्या अनेक कार्यक्रमांचे सुध्दा पाकिट वाटायचे होते परंतू खात्रीलायक सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे ती पाकिटे या दोघांनीच गायब केली आहेत. एका इमारतीतील हे दोघे या कार्यक्रमाला आपल्या हातात आहे असे दाखवत आहेत. अनेक वृत्तवाहिन्या सोडल्यानंतर सध्या गौतम अडाणीच्या वृत्तवाहिनीत हे पत्रकार महोदय कार्यरत आहेत. माझ्यामुळेच जिल्हा चालतो अशा अर्वीभावात वागतात. पाकिटे वाटपाचा कार्यक्रम झाला असला तरी पाहुया किती जण या बातम्या लिहितात आणि किती वृत्त वाहिन्या या बातम्या दाखवतात. आम्हाला असे वाटते की, काही युट्युब चॅनल जरुर आजची बातमी दाखवतील.
खेळांच्या स्पर्धांची पत्रकारीता कशी करावी याबाबत किती पत्रकारांना जाण आहे. याचा तर शोध घेण्यासाठी एखादी समिती स्थापन करावी लागेल. तरच पुढे होणाऱ्या तीन दिवसांच्या खेळांबाबतची पत्रकारीता खऱ्या अर्थाने होईल आणि त्या समितीने ठरविलेल्या पत्रकारांनाच ते करता येईल.या पत्रकार महोदयांचा आणखी एक जबरदस्त व्यवसाय आहे. माहिती अधिकार अर्ज कोण्या तरी अमुक माणसाच्या नावाने करायला लावायचा. माहिती अधिकारी आणि त्यांनी मिळून त्या माणसाला सर्व माहिती द्यायची आणि त्यानंतर मात्र ज्या अधिकाऱ्याबद्दल माहिती देण्यात आली त्यात आणि अर्ज करणाऱ्यांमध्ये मध्यस्थी करून दलाली खायची. म्हणूनच स.आदत हसन मंटो म्हणाले होते की, कोठे की एक तवायफ और बिका हुवा पत्रकार एकही श्रेणी में आते है। लेकिन इनमे तवायफ की इज्जत जादा होती है।
कोळसा खाणी मालक पत्रकाराने सर्व पत्रकारांचे गुत्ते घेतले
