नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील लक्ष्मीनगर भागात एका 25 वर्षीय युवकाने तु मला का बोलत नाहीस या कारणावरुन एका महिलेचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार घडला आहे.
तिरोना लक्ष्मण उसकेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लक्ष्मीनगर येथे 15 फेबु्रवारी रोजी दुपारी 4 वाजता कल्पना दत्ता उसकेवाड (25) या महिलेला त्याच भागातील वैभव दिपक पाईकराव (25) या युवकाने तु मला का बोलत नाहीस, का नकार देतेस या कारणावरून तिचा कोणत्या तरी वस्तुने गळा आवळून खून केला आहे. विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 54/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक साने अधिक तपास करीत आहेत.
तु का मला बोलत नाहीस म्हणून 25 वर्षीय युवतीचा खून
