नांदेड(प्रतिनिधी)-गोदावरी नदीकाठी असलेल्या हस्सापूरच्या पुलाखाली 20-30 वर्षाच्या अज्ञात व्यक्तीचा खून घडला आहे. ही घटना 12 फेबु्रवारीच्या दुपारी 11.45 वाजता समोर आली आहे.
वजिराबाद येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय लोंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हस्सापूर ब्रिजखाली सापडलेल्या व्यक्तीची ओळख अज्ञात आहे. त्याचा धार-धार शस्त्राने गळा चिरून त्याचे प्रेत पुलाखाली फेकून देण्यात आले आहे. या संदर्भाने वजिराबाद पोलीसांनी अज्ञात व्यक्तीच्या खूनासाठी अज्ञात मारेकऱ्यांविरुध्द गुन्हा क्रमांक 65/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक बालाजी किरवले यांच्याकडे देण्यात आला आहे. वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांनी जनतेला आवाहन केले आहे की, कोणी 25-30 वर्षाच्या व्यक्ती तुमच्या घरातून, तुमच्या आसपासहून गायब झालेला असेल तर त्या संदर्भाने जनतेजवळ असलेली माहिती त्यांनी वजिराबाद पोलीसांना द्यावी. जेणे करून या अज्ञात मयताची ओळख पटेल आणि अज्ञात मारेकऱ्याविरुध्द कार्यवाही करणे शक्य होईल.
अज्ञात व्यक्तीचा अज्ञात मारेकऱ्यांनी केला खून
