कोणाचा ही फोन न उचलणारे महाराष्ट्र कॉंगे्रसचे अध्यक्ष नाना पटोले यांना खा.राहुल गांधी यांनी नारळ दिला आहे. त्यांच्या जागी कबडीचे उत्कृष्ट खेळाडू आणि कॉंगे्रसचे कार्यकर्ते बुलढाणा येथील हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्र कॉंगे्रस अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सपकाळ यांच्यापुढे आव्हाण मोठे आहे. अत्यंत त्रासात असलेल्या कॉंग्रेसची ही वरात ते कसे पुढे नेतील हे त्यांचे कसब त्यांना सिध्द करायचे आहे. सोबतच विधानसभेत कॉंगे्रसचे नेते विजय वडेट्टीवार यांना पुन्हा विधानसभेचे नेते पद देण्यात आले आहे.
नाना पटोले हे पिकांना मिळणाऱ्या भावांच्या कारणातून कॉंगे्रस सोडून भारतीय जनता पार्टीत गेले होते. 2013 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणुक जिंकली. 2017 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देवून पुन्हा कॉंग्रेस गाठली. तेथे कॉंगे्रस पक्षाकडून जिंकल्यानंतर त्यांना मंत्रीपद हवे होते. परंतू मंत्री पदाची त्यांची इच्छा पुर्ण झाली नाही. त्यांना विधानसभेचे सभापती पद मिळाले. पण मंत्री पद न मिळाल्याची खदखद त्यांच्या मनात तशीच राहिली. तेंव्हा त्यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला. त्यात ही खेळी होती की, कॉंगे्रसचे मंत्री बबनराव थोरात किंवा नितीन राऊत यांना मंत्री पदाचाा राजीनामा देवून सभापती बनवले जाईल आणि त्यांचे मंत्री पद मला मिळेल आणि येथेच हा घटनाक्रम कॉंगे्रससाठी अत्यंत घातक ठरला. कारण नवीन सभापती आलाच नाही आणि उपसभापतीनेच सभापती कार्यकाळ चालविला. त्या काळात अनेक खलबते झाली. आणि त्यातूनच शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडण्याचा घटनाक्रम सार्थ झाला. त्यानंतर सरकार गेली आणि नाना पटोले यांनी महाराष्ट्र कॉंग्रेस अध्यक्ष होण्यास सकारात्मकता दाखवल्यानंतर ते अध्यक्ष झाले आणि हे अध्यक्ष पद त्यांनी चार वर्ष चालविले. हा चार वर्षाचा कार्यकाळ कॉंगे्रससाठी ग्रहण काळ होता.
अध्यक्ष नाना पटोले कोणाचाही फोन उचलत नव्हते. कोणाला प्रतिसाद देत नव्हते त्यांनी उध्दव ठाकरे, शरद पवार यांना सुध्दा चांगला प्रतिसाद दिला नाही आणि त्यांना नाराज करत राहिले. त्यांचे चमचे मात्र त्यांना मुख्यमंत्री असे संबोधन करत होते आणि मुख्यमंत्री हा शब्द ऐकून त्यांच्यातली फुग वाढत राहिली. विदर्भात कॉंगे्रसला लोकसभेत 13 जागा मिळाल्या होत्या. खरे तर ही कमाल कॉंगे्रसची नव्हती तर उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या युतीची होती. उध्दव ठाकरे या काळात कमी पडले. कारण त्यांच्याकडे आवक आहे जावक नाही. तसेच त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्याकडे आवक आणि जावक या दोन्हीचे दरवाजे बरोबरीत उघडे आहेत. त्यावेळी महाविकास आघाडीला आम्ही जिंकणार हा आत्मविश्र्वास वाढला होता. त्या आत्मविश्र्वासातून मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न सर्वांना पडू लागले. त्यामुळे कॉंगे्रसमध्ये सुध्दा तिकिट विक्री झाले. काही व्यक्तीगत स्वार्थ आणि व्यक्तीगत मनोरंजनासाठी विधानसभा निवडणुकीत अनेक जागा शहिद झाल्या आणि अखेर नाना पटोलेचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न धुळीत मिळाले. संपुर्ण महाविकास आघाडीचा चक्काचुर झाला. विधानसभेच्या 288 आमदार संख्येमध्ये 16 आमदार एवढी खालची परिस्थिती कॉंगे्रसची कधीही आली नाही. नाना पटोले विरुध्द अनेक तक्रारी वरपर्यंत पोहचल्या परंतू खा.राहुल गांधी त्यंाच्यावर डोळे झाकून विश्र्वास करत राहिली आणि या विश्र्वासाना नाना पटोले यांनी नेहमीच दगा दिला. कॉंगे्रसमध्ये प्रत्येक जण आपले स्वार्थ पाहत राहिले आणि कॉंग्रेस खाली-खाली येत राहिली.
महाराष्ट्रामध्ये कॉंगे्रसचा डीएनए आहे. हे पाहुन खा.राहुल गांधी यांनी आपली भुमिका बदलली आणि कॉंगे्रस अध्यक्ष नाना पटोले यांना नारळ दिला. पण दुर्देवाने कॉंगे्रस पुर्णपणे समाप्त झाल्यानंतर नेत्यांना हे कळले. आता बुलढाणा येथील हर्षवर्धन सपकाळ यांना नुतन अध्यक्ष करण्यात आले आहे. ते गांधीवादी आहेत. सर्वोदयवादी आहेत. राहुल गांधींचे विश्र्वास पात्र आहेत. कॉंगे्रसचे ऑल इंडिया सचिव असतांना त्यांनी अनेक कामे केली. त्यावेळी गुजरातचे ते प्रभारी होती. त्यावेळी त्यांच्यावर पैसे देवाण-घेवाणीचा आरोप सुध्दा झाला. पण असे आम्हाला वाटत नाही की त्यांनी असे काही केले असेल. कारण सरपंच पदापासून सुरूवात केल्यानंतर सर्वात कमी वयाचे जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाली होती. ते एकदा आमदारही होते. आज राजीव गांधी पंचायती राज या संस्थेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांना महाराष्ट्राचे कॉंगे्रस अध्यक्ष पद देण्यात आले आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर आव्हाण मोठे आहे. कारण आज एक हाती सत्ता असलेले फडणवीस सरकार आहे. दुसऱ्या बाजूला कॉंगे्रसचे आपसातील वाद आहेत. ग्रामीण भागातील कॉंगे्रस कार्यकर्त्यांचा तुटलेला आत्मविश्र्वास त्यांना पुन्हा उभारायचा आहे. कार्यकर्त्यांसोबत सुसंवाद साधतांना त्यांना कार्यकर्त्यांचा नेता बनायचे आहे. महाराष्ट्रात कॉंगे्रसचा मतदार आहे. पण कार्यकर्ता त्यांच्यापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी कॉंगे्रस अध्यक्षाची आहे. आजही तिन चार पिढ्यांपासून कॉंगे्रसचे काम करणारे कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत. हर्षवर्धन सपकाळ हे कबड्डी खेळाडू आहेत. सात खेळाडूच्या या टिममध्ये समन्वयानेच सामना जिंकता येतो. अर्थात समन्वयाची कला त्यांच्यात आहेच हे मानायला हरकत नाही. पण राजकारण आणि कबड्डी खेळ यामध्ये मोठे अंतर आहे. तरी पण हर्षवर्धन सपकाळ यांचा कॉंगे्रसमधील सेवाकाळ लक्षात घेतला तर त्यांना जास्त अवघड होणार नाही असे आज तरी माणूया आणि ते उत्कृष्ट काम करतील आणि कॉंगे्रसला पुन्हा एकदा उभारून जबरदस्त आव्हाण विरोधकांसमोर उभे करतील यासाठी आमच्याही शुभकामना.
महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंना नारळ; नुतन अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
