शिक्षीकेच्या पतीची आत्महत्या; एका विरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-शिक्षीकेच्या पतीला पैशांसाठी त्रास दिल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. या संदर्भाने शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हेगाराविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
पीपल्स हायस्कुल येथील शिक्षीका प्रिती शरद अनुमला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 5 वाजता त्यांचे पती शरद क्षणमुखम्‌ अनुमला यांनी गोकुळनगर भागातील आपल्या स्वत:च्या घरी छतातील हुकामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. ही आत्महत्या लक्ष्मीनगर येथील दिलीप दिगंबर वाघमारे यांच्याकडून घेतलेले पैसे परत न देणे आणि सर्व कुटूंबाला खतम करून टाकतो अशी धमकी दिलीप दिगंबर वाघमारे यांनी दिल्यानंतर घडली आहे असा तक्रारीचा आशय आहे. शिवाजीनगर पोलीसांनी या संदर्भाने गुन्हा क्रमांक 57/2025 भारतीय न्याय संहितेच्या कलम 108, 351(2), 351(3) प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे हे स्वत: करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!