नांदेड(प्रतिनिधी)-पेट्रोल पंपावर नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्याकडे जमलेली रोख रक्कम आणि ऑनलाईन आलेले पैसे सुध्दा स्वत:च्या क्युआर कोडवर जमा करून घेऊन पेट्रोल पंप मालकाच्या पैशांची चोरी केली आहे.
कपिल गणपतराव नरवाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 फेबु्रवारी ते 11 फेबु्रवारी या 24 तासामध्ये मालेगाव रोडवरील खुरगाव येथे त्यांच्या एम.एस.अनुराग पेट्रोलियम येथे पेट्रोल पंपावर काम करणारे सौरभ शिवराज पांडे याने त्या कालखंडात पेट्रोल पंपावर रोख पध्दतीने आलेली रक्कत तसेच त्या दिवशी ऑनलाईन प्रमाणे स्वत:चा वेगळा क्युआरकोड देवून ग्राहकांकडून त्यात पैसे जमा करायला लावले. असे एकूण 1 लाख 34 हजार 20 रुपयांची चोरी केली आहे. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 101/2025 दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार माळवे हे करीत आहेत.
पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या नोकरानेच मालकाचे 1 लाख 34 हजार चोरले
