नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथील बालाजी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपल्या हातात 2 लाख 50 हजार रुपयांची कॅरीबॅग दोन चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून नेली आहे. तसेच किनवट येथील एक मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी त्यातून वेगवेगळे साहित्य असा एकूण 14 हजार 580 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
नारायण तुकाराम पवार हे 62 वर्षीय व्यक्ती 12 फेबु्रवारी रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास एका ऍटोमधून उतरून बालाजी मंदिराजवळून दत्तनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर चालत असतांना त्यांच्या हातातील कॅरीबॅगमध्ये 2 लाख 50 हजार रुपये होते. दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी त्यांच्या हातातील कॅरीबॅग बळजबरीने हिसकावून पळून गेले आहेत. लोहा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 49/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक पाटील हे करत आहेत.
किनवट येथील अब्दुल खालेद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार किनवट शहरात त्यांची के.के.मोबाईल शॉपी आहे. 12 फेबु्रवारी रोजी मध्यरात्री 2 वाजेच्यासुमारास त्यांच्या दुकानाच्या शटरचे लॉक तोडून चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम 3 हजार 800 रुपये, दुकानातील विविध कंपन्यांचे स्मार्ट वॉच, एअर बर्डस्, चार्ज एकूण 10 हजारी 780 रुपयांचे असा एकूण 14 हजार 580 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. किनवट पोलीसांनी या संदर्भाने गुन्हा क्रमांक 37/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार वाडगुरे हे करीत आहेत.
लोहामध्ये 2 लाख 50 हजारांची जबरी चोरी; किनवटमध्ये मोबाईल शॉपी फोडली
