नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील नंदिग्राम सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन राजेश सोनकांबळे यांनी निवडणूक झाल्यानंतर विहित कालावधीमध्ये निवडणुकीच्या खर्च दाखल न केल्याने नियम 2014 चे नियम 66 अन्वये सहकारी संस्था निंबधक यांनी तीन वर्षाकरिता त्यांना अपात्र केले आहे.
नंदिग्राम सहकारी संस्था नांदेड ही संस्था महाराष्ट्र सरकारी सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणी झालेली सहकारी संस्था आहे. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था समिती निवडणूक नियम 2014 मधील तरतुदीचे पालन करणे बंधनकारक आहे. परंतु संस्थेचे चेअरमन राजेश सोनकांबळे यांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने त्यांच्यावर तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरदार तेजवान सिंह पुंड यांनी केली होती. त्या अनुषंगाने दिनांक 24 जानेवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. सुनावणीस पुराव्यासह सादर उपस्थित राहून सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होता राजेश सोनकांबळे यांना सदर नोटीस तालीम करण्यासाठी कार्यालयातील कर्मचारी दिनांक 17 जानेवारी रोजी संस्थेच्या शारदानगर येथील कार्यालयास गेले असता सदरील कार्यालय बंद होते. त्या नंतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन नोटीस देण्याच्या प्रयत्न केला परंतु कुटुंबातील सदस्यांनी नोटीस घेण्यास नकार दिला शिवाय संस्थेचे अध्यक्ष राजेश सोनकांबळे यांनीही काम काजाचे पत्र घेण्यास नकार दिला होता. निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर 60 दिवसाच्या आत निवडणूक निर्णय अधिकारी किशोर सादर करणे बंधनकारक आहे परंतु सोनकांबळे यांना ठरवून दिलेल्या कालावधीत निवडणूक खर्च सादर केला नसल्याने आढळून आले त्यामुळे राजेश सोनकांबळे हे महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम 2024 चे नियम 66 मधील तरतुदीनुसार संस्थेच्या समिती सदस्य म्हणून अपात्र असल्याचे आदेश सहकारी संस्था नांदेड चे उपनिबंधक सी.एस मगर यांनी आदेश निर्गमित केले आहे.