उमरी पोलीसांची वाळू माफियांविरुध्द जबरदस्त कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-उमरी पोलीसांनी वाळू माफीयांविरुध्द जबरदस्त कार्यवाही करत 12 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि काही मुद्देमाल अर्थात तराफे तेथेच जाळून टाकले.
धर्माबादचे पोलीस उपअधिक्षक प्रशांत संपत्ते यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक अंकुश माने, पोलीस उपनिरिक्षक सचिन आरमाळ, पोलीस अंमलदार देवराव वडजे, सुदर्शन धांदु, गोविंद शिंदे, रामन फकीरा गेडाम, केळकर, माधव पवार, अरविंद हैबतकर, प्रितम डोमपल्ले, शेख फेरोज, गुरुपवाड, गृहरक्षक दलाचे जवान हर्षद लांडगे, अविनाश राठोड, उसकलवाड, सोनाई आदींनी ही कार्यवाही केली.
पोलीस पथकाने उमरी जवळील मनुर शिवारात गोदावरी नदीपात्राच्या परमेश्र्वर मंदिराच्या पाठीमागे गोदावरीच्या बॅक वॉटरवर लावलेली एक बोट, चार तराफे, एक दुचाकी गाडी असा 12 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या संदर्भाने पोलीस अंमलदार अरविंद हैबतकर यांच्या तक्रारीवरुन उत्तर प्रदेशातील गोविंदा तेजनारायण भारती, सचिन पाटील आणि सुरेश पाटील यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 48/2025 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार गोविंद शिंदे अधिक तपास करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!