नांदेड(प्रतिनिधी)-कुंडलवाडी पोलीसांनी एकाच दिवशी दोन बेकायदा वाळू वाहतुक करणाऱ्या गाड्या पकडून त्यांच्या विरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील गुन्हयांमध्ये मालकांना सुध्दा आरोपी करण्यात आले आहे.
दि.2 फेबु्रवारी 2025 रोजी दाखल झालेल्या दोन गुन्ह्यांप्रमाणे कुंडलवाडी पोलीसांनी 1 फेबु्रवारीच्या सायंकाळी 5 वाजता आणि रात्री 9 वाजता दोन जागी गाड्या पकडल्या. त्यामध्ये एका वाहनाचा क्रमांक एम.एच.18 ए.ए.9668 हा 14 टायरचा ट्रक बिना परवाना रेती भरलेला होता. तसेच एम.एच.40 सी.टी. 0362 हा 14 टायरचा दुसरा ट्रक पकडला. या दोन ट्रकची किंमत 20 लाख रुपये आहे आणि त्यात भरलेल्या वाळूची किंमत 40 हजार रुपये आहे. या संदर्भाचे कुुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर पांडूरंग शिंदे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 10/2025 दाखल करण्यात आला. या प्रकरणात राजेश मोहन आडे (34) रा.कवडीपुर ता.पुसद जि.यवतमाळ तसेच शेख सोहेल शेख जलील (26) रा.पुसद जि.यवतमाळ या दोन चालकांसह पुसद येथील या गाड्यांचे मालक केतन काळे, शेख इकबाल शेख मुस्ताक या चार जणांना आरोपी करण्यात आले आहे.
दुसऱ्या एका प्रकरणात कुंडलवाडी पोलीसांनी एक ट्रॅक्टर पकडला. या ट्रॅक्टरचा क्रमांक पी.एस.16 ई.एन.5212 असा आहे. या ट्रॅक्टरची किंमत 3 लाख रुपये आणि त्यात भरलेली वाळू 62 हजार रुपयंाची असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या संदर्भाने पोलीस अंमलदार रघुविरसिंह विठ्ठलसिंह चव्हाण यांच्या तक्रारीवरुन ट्रॅक्टर चालक व मालक विरुध्द गुन्हा क्रमांंक 11/2025 दाखल करण्यात आला आहे. या दोन कार्यवाह्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर शिंदे यांच्यासह पोलीस अंमलदार शंकर चव्हाण, माधव पाटील, रामेश्र्वर पाटील, रविंद्र देशमुख, अमर शिंदे, इद्रिस बेग आणि रघुविरसिंह चव्हाण यांनी सहभाग घेतला.

