नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातून दोन पोलीस उपनिरिक्षक, चार श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, चार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि दोन पोलीस अंमलदार असे 12 जण सेवानिवृत्ती झाले आहेत. पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांच्या हस्ते त्यांना निरोप देण्यात आला.
आज नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरिक्षक रमेश मोहनबुबा गिरी (पोलीस ठाणे सिंदखेड), शेख आयुब शेख इमामसाब (नियंत्रण कक्ष नांदेड), श्रेणी पोलीस उपनिरिक्षक चॉंद पाशा नुरपॉशा सय्यद(पोलीस ठाणे किनवट), केशव रामचंदर राठोड (पोलीस ठाणे भोकर), रामचंदर दत्तात्रय दराडे(पोलीस ठाणे माहूर), शिवाजी शामराव वड(अर्धापूर), सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक नागोराव गोविंदराव आत्राम(माहूर), आनंद यशवंता कंधारे (वजिराबाद), विनायक देवराव बाबर(कंधार), यशवंत तुकाराम जाधव(इतवारा), पोलीस अंमलदार अनिलकुमार गणेश लाठकर(सोनखेड), पंडीत गणपत कदम(पोलीस ठाणे इतवाराा) हे आपल्या विहित सेवाकाळानंतर सेवानिवृत्त झाले आहेत. आज त्यांना पोलीस अधिक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात सहकुटूंब सन्मान करून पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांनी निरोप दिला. पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे यांच्यासह अनेक पेालीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोलीस उपनिरिक्षक माया भोसले यांनी केले. पोलीस अंमलदार सविता भिमलवाड यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
नांदेड जिल्हा पोलीस दलातून दोन पोलीस उपनिरिक्षक, चार श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, चार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, दोन पोलीस अंमलदार सेवानिवृत्त
