नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी प्राप्त झालेल्या माहितीनुसार नांदेड ते मनमाड या रेल्वे रुळांच्या दरम्यान सारवाडी ते कोडी या दोन स्थानकांच्यामध्ये रेल्वे रुळांवर एक ट्रक अडकल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती. प्राप्त झालेल्या व्हिडीओमध्ये नांदेडकडे येणारी तपोवन एक्सप्रेस थांबलेली दिसते.
जालना ते परभणी दरम्यानच्या रेल्वे रुळांमध्ये सारवाडी-कोडी अशी दोन रेल्वे स्थानक आहेत. या दोन रेल्वे स्थानकामध्ये असलेल्या रेल्वे रुळांना पार करतांना एक ट्रक रेल्वे रुळांमध्ये अडकला प्राप्त झालेल्या व्हिडीओमध्ये ट्रकला बाहेर काढ्ण्यासाठी बरीच जमीन खोदल्याचे दिसते. परंतू ही जमीन खोदल्यामुळे रेल्वे रुळांना काही नुकसान होईल काय हे आता तरी सांगता येत नाही. परंतू या घटनेने रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली. प्राप्त झालेल्या व्हिडीओमध्ये मुंबईवरुन नांदेडकडे येणारी तपोवन एक्सप्रेस तेथे थांबलेली दिसते. ट्रक बाहेर निघाला तरीपण रेल्वे रुळांची तपासणी आवश्यक आहे असे आम्हाला तरी वाटते.
रेल्वे रुळांवर ट्रक फसल्याने तपोवन एक्सप्रेस अडकली
