महाराष्ट्रातील पाच खासदार आणि तीन आमदार गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. हे सर्व आठ जण शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आहेत. एकीकडे शिवसेनेच्यावतीने संजय राऊत सांगतात की, राज्यात तिसरा उपमुख्यमंत्री होणार आहे आणि त्यांचीच माणसे गायब होत आहेत हा दुर्देवी प्रसंग आहे. गायब होणाऱ्या खासदारांनामध्ये हिंगोली आणि परभणी येथील खासदारांचा सुध्दा समावेश आहे. आपल्या विधानसभेतील पराभवानंतर आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची हारलेल्या राजकीय पक्षांना गरज होती आणि ती गोष्ट लक्षात न आल्यामुळे असे घडत असेल. किंवा केंद्र सरकारमध्ये नितिशकुमार आणि चंद्राबाबु नायडु यांना शह देण्यासाठी ही खेळी करण्यात आली असेल. सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आपल्या गावाकडे जाऊन नॉटरिचेबल झाले आहेत म्हणे.
आज अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर महाराष्ट्रातील पाच खासदार गायब झाल्याची खर्चा सुरू झाली. त्यात वाशिमचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे बंडू जाधव, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, मुलूंड मुंबई येथील संजय दिना पाटील यांचा समोवश आहे. गायब झालेल्या आमदारामध्ये दिलीप सोपल, राहुल पाटील, बाबाजी काळे यांचा समावेश आहे. या सर्व मंडळींना आपण सत्तेत असावे असे वाटते. पुढे पाच वर्ष काहीच भविष्य दिसत नाही आणि बहुदा यामुळेच हे गायब झाले असावे अशी चर्चा होत आहे. यातील संजय पाटील यांचे वडील दिना पाटील हे तर अत्यंत पुजनिय व्यक्ती होते. ते मुंबईच्या माथाडी कामगारांचे नेते होते. अगोदर राष्ट्रवादी आणि नंतर शिवसेना उध्दव ठाकरे गटातून त्यांनी मुलूंड मतदार संघाची निवडणुक लढवली आणि ते जिंकले. नागेश पाटील आष्टीकर हे सुध्दा शिवसेनेचे कट्टर समर्थक आहेत. बंडू जाधव यांचे नाव तर घेतांना लोक घाबरतात अशी त्यांची ख्याती आहे. ओमराजे निंबाळकर यांचा समावेश तर राजकारणापेक्षा राजांच्या यादीत आहे.
आपण हरलोत म्हणून पळून जाण्याची काय गरज होती. कारण कधी काळी भारताच्या लोकसभेत भारतीय जनता पार्टीचे दोनच खासदार ते म्हणजे अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी त्यावेळेस हारले म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पळ काढला नाही. तर ते लढत राहिले आणि खरे आहे. जिवंत राहिलो तरच लढू ना आणि पुन्हा जिंकू अशा परिस्थितीला वगळून उगीचच एखाद्या गोष्टीला इको करायाचा आणि त्यातून आपल्या भविष्याचा शोध करतांना दुसऱ्यांचे उंबरठे शोधायचे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार, राहुल गांधी आणि उध्दव ठाकरे यांची एक टिम होती. सर्वांनी एक दुसऱ्याला मदत करून लोकसभा निवडणुुकीमध्ये सत्ताधिशांना त्यांची जागा दाखवली. महाराष्ट्राच्या निवडणुकीमधील जवळपास 100 विधानसभा मतदार संघामध्ये मशिनचा घोळ झाला अशी ओरड होत आहे. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालय आणि जनतेपर्यंत जाण्याच्या गोष्टी सुरू आहेत. त्या काय होतील त्या होतील परंतू त्या वादग्रस्त 100 जागा वगळल्या तरी 188 मतदार संघामध्ये झालेल्या निवडणुकीमधील मशिनवर कोणाचा आक्षेप नाही. त्याही मतदार संघाचा विचार केला तर अनेक मतदार संघांमध्ये आपल्याच पक्षाला ती जागा मिळावी असा राज हट्ट लावून धरल्याने उध्दव ठाकरे यांना त्या जागा देण्यात आल्या. परंतू अशा 17 जागा ते हरले आहेत.
हरल्यानंतर सुध्दा उध्दव ठाकरे यांनी संवाद सुरू ठेवायला हवा होता. तुमच्या मागे गर्दी आहे, तुम्हाला चांगले बोलता येते यावर तुम्ही चांगले नेता आहात हे ठरत नाही. त्यासाठी तुमच्या पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनात तुमची प्रतिमा एवढी जबरदस्त हवी की, तो कार्यकर्ता तुम्हाला सोडून कोठेच पळून जाणार नाही. पक्ष फोडणे आणि घरफोडणे याची सुरूवात महाराष्ट्रात शरद पवारांनी केलेली आहे आणि त्यांनी पहिला प्रयोग छगन भुजबळ यांच्यावर केला. छगन भुजबळ हे आज ही मनाने खरे शिवसैनिकच आहेत असो. त्यांनी जेंव्हा पक्ष सोडला. तेंव्हा मातोश्रीवर मा साहेबांनी आपल्या दु:खाला आपल्या आश्रुंच्याद्वारे दिलेली वाट पाहुन अनेक जण थक्क झाले होते. तेंव्हा त्या म्हणाल्या होत्या माझ्या घरातला एक माणुस घर सोडून गेला आणि त्या दु:खाचे हे अश्रु आहेत. आज केंद्र सरकारमधील भारतीय जनता पार्टी 240 या संख्येवर असल्यामुळे त्यांच्या मानेवर नितेशकुमार आणि चंद्राबाबु नायडु यांची लटकती तलवार आहे. ती तलवार आपल्या मानेवरून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी काही खेळी करत असेल म्हणूच पाच खासदार आणि तीन आमदार गायब आहेत. भारतीय जनता पार्टीला सर्वच काही आपल्या हातात पाहिजे आहे. ज्यात प्रशासन आणि कोणत्याही विरोधी पक्ष नसावा यावर त्यांचा जोर असतो. ते यशस्वी करण्यासाठी शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या पाच खासदारांना काही तरी गाजर दाखविले असणार. तसेच तीन आमदारांना सुध्दा तसेच केले असेल. कारण महाराष्ट्रात सुध्दा भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदे यांना वेगळे करून पुढे येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणुक जिंकायची आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे पेक्षा उध्दव ठाकरे भारतीय जनता पार्टीला जास्त परवडणारे आहेत. म्हणून ही सगळी खेळी सुरू असेल. मागील एका महिन्यापासून बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार सुध्दा पुढे येणाऱ्या बिहार निवडणुकीमध्ये आपला सुध्दा एकनाथ शिंदे होवू नये म्हणून त्यांनी तयारी सुरू केली आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी आपल्या स्वत:ची संख्या 272 पेक्षा जास्त व्हावी यासाठी वेगवेगळे प्रयत्न देशात करत आहे. त्यातीलच महाराष्ट्रात 5 शिवसेनेचे खासदार गायब होणे हा सुध्दा एक प्रकार असेल.
सोर्स:- न्युज लॉंचर-आशिष चित्रांशी आणि अशोक वानखेडे.