नांदेड(प्रतिनिधी)- 45 ते 50 वर्षाचा एक मनोरुग्ण सदृश्य सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतांना मिळून आला आहे. या व्यक्तीची ओळख असेल तर त्यांनी वजिराबाद पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांनी केले आहे.
आज दि.25 जानेवारी रोजी पोलीस अंमलदार एस.बी.राठोड आणि त्यांचे सहकारी पवार हे गस्त करत असतांना हिंगोली गेट जवळच्या व्यंकटेशनगरमध्ये असलेल्या हनुमान मंदिरा पाठीमागे एक 45 ते 50 वर्षाचा व्यक्ती आरडाओरड करून लोकांना त्रास देत असतांना सापडला आहे. याबाबत पोलीसांनी वास्तव न्युज लाईव्हला दिलेल्या माहितीनुसार फोटोमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीस कोणी ओळखत असेल तर त्यांनी वजिराबाद पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी. जेणे करून या व्यक्तीसाठी काही तरी करता येईल.