दिव्यांगांच्या आंदोलनाला अंशत: यश

नांदेड(प्रतिनिधी)-आज दिव्यांग मतदारांनी आपले मतदानपत्र परत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडलेल्या ठिय्या आंदोलनाला अंशत: यश आले असून जिल्हा प्रशासनाने तुमच्या सर्व मागण्या लवकरात लवकर आढावा बैठकीचे आयोजन करून त्या मागण्यांना दिशा देण्यात येईल असे पत्र दिले आहे. या पत्रावर मात्र जिल्हाधिकाऱ्यांकरीता असे लिहुन स्वाक्षरी करण्यात आली आहे. मुळात असे लिहु नये असे शासनाचे आदेश आहेत. अशा ठिकाणी स्वाक्षरी करतांना स्वाक्षरी करणाऱ्याने आपले नाव आणि पदनाम लिहुन स्वाक्षरी करावी असे शासनाने आदेशीत केलेले आहे. दरम्यान खा.राजेंद्र चव्हाण यांनी दिव्यांगांची भेट घेवून माझ्यावतीने ज्या काही योजना दिव्यांगांसाठी असतील त्या मी पुर्ण करेल असे आश्वासन दिले.
देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष उलटली. तरी दिव्यांगांना त्यांच्या योजनांपासून वंचित ठेवण्यात येते म्हणून आज दिव्यांग मतदारांनी आपले मतदान पत्र जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणुक आयोगाला परत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन मांडले होते. अनेक दिव्यांग मतदार आपले मतदान कार्ड घेवून तेथे आले होते आणि ते परत करायचे आहे असे सांगत होते. मागील सहा महिन्यात 76 लाख मतदार वाढल्याचे दाखविले जात आहे हा प्रकार संशयास्पद आहे. म्हणूनच आम्ही आज 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदान दिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आमचे मतदान कार्ड निवडणुक आयोगाला परत करण्यासाठी थांबलो आहोत अशी मागणी होती.
प्रशासनाच्यावतीने असे सांगण्यात आले की, आम्ही मतदान कार्ड परत घेवू शकत नाही. तेंव्हा दिव्यांग आंदोलकांनी यावर आक्षेप घेत जोरदार घोषणा बाजी केली. त्यानंतर प्रशासनाच्यावतीने आपल्या आजच्या अर्जानुसार जिल्ह्यातील सर्व विभागांना तुमच्या योजनांबद्दल काम करण्यासाठी सांगितले आहे आणि त्यांचा अहवाल 15 फेबु्रवारीपर्यंत मागविला आहे. तसेच लवकरच आढावा बैठक घेवून दिव्यांग योजनांबद्दल लवकरात लवकर कार्यक्रम आखला जाईल असे आश्वासन दिले. दरम्यान या आंदोलकांना भेटण्यासाठी नवनिर्वाचित खा.राजेंद्र चव्हाण आले होते. त्यांनी खासदाराच्यावतीने ज्या-ज्या काही योजना दिव्यांगांसाठी असतात त्या मी लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले.


या आंदोलनात राहुल साळवे, बालाजी ढगे, कार्तिक भरतीपुरम, प्रशांत हनमंते, अब्दुल खादल, विश्र्वाभंर दळवे, शेख इमरान, शेख अनवर, शेख अली शेख अब्दुल सत्तार, रेहानाबी मोहम्मद नुर बागवान, शेख मोसीन शेख रब्बानी, सरफराज खान जाफर खान, किरणकुमार नयालपेल्ली, जयपाल आडे, गजानन कोळशीकवार, अतिक हुसेन, गुलाम हुसेन, शेख अलीम शेख करीम, अब्दुल खादर अब्दुल वाहेद, शेख महम्मद अलताफ शेख गणी, शेख शाहरुख शेख मौला, गंगाधरर कावळे, सय्यद आरीफ, नारायण ताडमलवार, राजेश फरकेडे, महम्मद रफिक कुरेशी, प्रदिप केदारी, सय्यद अफरोज, सलीम खान इब्राहिम खान, सय्यद माजीद सय्यद मंजुर अली, शिवाजी सुर्यवंशी, शेख शोयब शेख खालेद, सुनिल कांबळे, मोहम्मद सिराज, शेख रिजवान अहेमद, शुभांग संगप्रवार, शेख जहिरोद्दीन शेख फकरोद्दीन शहबाज सलीम पठाण, समरीन बेगम पठाण, शेख रियाज, अफरोज खानम, शेख हबीब, मोहम्मद फैजल, प्रविण भंडारे, चंद्रशेखर पोला, विद्याधर गिरी, अजय मोरे, हसन खान, वासीम कुरेशी, रमेश झगडे, मंगेश थोटकर, प्रमोद मांजरमकर, सिध्दोधन गजभारे, अल्का थोरकर, कल्पना सकते, भाग्यश्री नागेश्र्वर, महम्मद साजिद पठाण, मधुकर वाघमारे, सारिका बर्डे, मोहम्मद जुनेद, मोहम्मद जुजयान, रामेश्र्वर बंडेवार, हसन कुरेशी, शेख मोहम्मद जहीर, निसार खान, राजू इराबतीन, ऋतिका भुरेवार, शेख मतिन, शिवाजी गुंजकर, सय्यद एजाज, प्रदीप हनवते, अंबादास धोतरे, अब्दुल रिहान, मोहम्मद उजेक, सविता नालटे, अब्दुल जमीर, गोविंद बोंडेवार, रिजवाना बेगम, शबाना बेगम, शेख जाकीर, मोहम्मद मोसीन, विनोद कोकाटे, मोहम्मद अब्दुल मोईन, आफरीन बेगम, समरीन बेगम, प्रियकुमार वैद्य, आसमा आयुब, सय्यद सलीम, शेख आलमगिर, अब्दुल रज्जाक, अब्दुल सद्दाम, मोहम्मद हमीद, मोहम्मद मुखेब, मोहम्मद नोमान, शमशा फातेमा, रईसखान, सय्यद मुन्नी अब्दुल रजाक, हनमंत मोकमपल्ले, शिवाजी पवार, आशिष हनवते, जफा खान, मोहम्मद इमरान, कैसर बेगम, व्यंकट येरेकर, सलीम खान, शेख मुसा, शेख मसुद, मोहममद साजिद, नागोराव कदम, महम्मद मजहर, शेख उमर, मजिद खान, मोहम्मद युसूफ, सय्यद अकबर, शेख गौस, मोहम्मद इरशाद, अब्दुल हमीद यांच्यासह असंख्य दिव्यांग सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!