राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत महाराष्ट्र मुलींच्या संघास सुवर्ण तर मुलाच्या संघास रौप्य पदक

नांदेड  – गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मुलींच्या महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले आहे. तर मुलांच्या संघात रौप्य पदक मिळाले आहे. नांदेड येथे सुरू असलेल्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेचा समारोप झाला.
 आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, महाराष्ट्र बुध्दीबळ असोसिएशन व नांदेड जिल्हा बुध्दीबळ असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय बुध्दीबळ (14 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 20 ते 24 जानेवारी, 2025 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल,नांदेड येथे संपन्न झाले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. डॉ. महेशकुमार डोईफोडे (आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका,नांदेड) हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन मा.श्री.जयकुमार टेंभरे (जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड), श्री.अंकुश रक्ताडे (सहसचिव, महाराष्ट्र बुध्दिबळ संघटना), डॉ.दिनकर हंबर्डे (सचिव,नांदेड जिल्हा बुध्दीबळ संघटना), मा.श्री.निर्मल जांगडे (निरीक्षक, एस.जी.एफ.आय.), श्री. प्रवीण ठाकरे (पंच प्रमुख), श्री.रमेश चवरे (उप आयुक्त, ) प्रा.श्री.इम्तियाज खान आदी मान्यवर उपस्थित होते.
समारोप कार्यक्रम प्रसंगी मा. डॉ.महेशकुमार डोईफोडे म्हणाले की, शालेय जिवनात बुध्दीबळ हा खेळ अतिशय महत्वाचा असून शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही उल्लेखणीय कार्य करुन करीयर घडवावे व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवावी असे सांगीतले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन व आभार प्रदर्शन डॉ.राहुल श्रीरामवार यांनी केले.
या राष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत संपुर्ण भारतातून 33 मुले , 30 मुली असे एकण 63 मुला-मुलींच्या संघानी सहभाग घेतला असून यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या संघाचे वर्चस्व राहीले आहे. स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे.
14 वर्षे मुली मध्ये प्रथम- महाराष्ट्र,  द्वितीय- गुजरात,  तृतीय- तमीळनाडू.
14 वर्षे मुले-  प्रथम- प्रथम- सीबीएसई , द्वितीय- महाराष्ट्र ,  तृतीय- गुजरात या संघानी प्राविण्य प्राप्त केले असून महाराष्ट्र राज्य प्रथम आलेल्या मुलीच्या संघामध्ये निहीरा कौल, सई पाटील, पलक सोनी, व्रितीका गमे, दिव्यांशी खंडेलवाल तर मुलांमध्ये द्वितीय आलेल्या संघात – विवान सरावगी, शौनक बडोले, विक्रमादित्य चव्हाण, निहान पोहाणे,  ध्रुवा पाटील या खेळाडूचा समावेश होता. या संघाचे प्रशिक्षक डॉ. निलकंठ श्रावण, श्री. चंद्रप्रकाश होनवडजकर हे होते तर संघ व्यवस्थापक म्हणुन श्री. संजय बेतीवार व श्री. विपुल दापके यांनी काम पाहीले.
या राष्ट्रीय स्पर्धेतील मुले व मुली यांना वैयक्तिक कामगिरी नुसार बोर्ड पारितोषक गोल्ड सिल्वर व ब्रांझ ए बी सी डी व इ टेबल वरील खेळाडूंना देण्यात आले. सदरील खेळाडू अनुक्रमे  मुले A) 1) कवीन ई ( सी बी एस इ ) 2) सणुश (केरळा) 3) मोतीवाल (गुजरात) B) 1) वल पटेल (गुजरात) 2) मितांश दीक्षित (केंद्रीय विद्यालय ) 3) आहन माथुर (सी आय बी एस एस ) C) 1) बडोले शोनक (महाराष्ट्र ) 2)प्रभ मनसिंग मलहोत्रा ( चंदीगड ) 3) मनियार हरीडे (सीआयएसइ ) D1) निहान पोहाने ( महाराष्ट्र ) 2)साहिल (केरळा ) 3)श्री साई वेदांश (केरळा ) E 1) कथिर टी (तामिळनाडू ).
मुलीमध्ये  A1) थारुणिका (तामिळनाडू ) 2 )अपूर्वा भोळे (तेलंगाना ) 3) पलक सोनी (महाराष्ट्र) B 1) शोमे अधित्री (गुजरात) 2) अनविथा प्रवीण (केरळा) 3) रितिका गमे (महाराष्ट्र) C 1) अर्पिता पाटणकर( गुजरात) 2) दिव्यश्री कोलीपरा( कौन्सिल इंडियन) 3) निहिरा कौल (महाराष्ट्र) D 1)  दुसिका चंदीगड 2) दिना पटेल( गुजरात) 3 )अभिष्री दिपू (बिहार)  E 1) श्रुती बोला (आंध्र प्रदेश)  2 )अनुषा( केरळा) 3)हिया शर्मा (चंदीगड).
या स्पर्धेकरीता मुख्य पंच म्हणुन श्री. प्रवीण ठाकरे तर पंच म्हणुन श्री. अमरीश जोशी (छत्रपती संभाजीनगर), श्री. शार्दुल तापसे (सातारा), श्री. भुपेंद्र पटेल (अहमदाबाद, गुजरात), श्रीमती पल्लवी कदम (अंबेजोगाई, बीड), श्रीमती सुचिता हंबर्डे (नांदेड), श्री. गगनदिपसिंघ रंधावा (नांदेड), श्री. शिषीर इंदुरकर (नागपूर), श्री. नथ्‍थु सोमवंशी (जळगांव), श्री. चैतन्य गोरवे (परभणी) श्री. सिध्दार्थ हटकर (नांदेड), श्री. प्रशांत सुर्यवंशी (नांदेड), श्रीमती ऋतुजा कुलकर्णी (नांदेड) आदीनी काम पाहीले.
सदर स्पर्धा यशस्वी करणेसाठी जयकुमार टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी. संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, डॉ. निलकंठ श्रावण (क्रीडा मार्गदर्शक, हिंगोली), डॉ. राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी)  विपुल दापके (क्रीडा अधिकारी), वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे. संजय चव्हाण,  आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, वैभव दोमकोंडवार, ज्ञानेश्वर सोनसळे.सुशिल कुरुडे, कपील सोनकांबळे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे व बुध्दिबळ असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदिनी सहकार्य करीत आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी  जयकुमार टेंभरे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!