नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेतील स्वच्छता सहाय्यक आयुक्त मोहम्मद सादीक यांना उपआयुक्त पदोन्नती देण्यात आली आहे. त्या पदोन्नतीबाबत चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करावी असा अर्ज सामाजिक कार्यकर्ते गौतम जैन यांनी मनपा आयुक्तांना दिला आहे.
महानगरपालिकेतील सहाय्यक स्वच्छता आयुक्त मोहम्मद सादीक यांना पदोन्नती देवून उपआयुक्त पद देण्यात आले आहे. याबद्दल गौतम जैन सांगतात अनुकंपामध्ये सेवा प्रवेश झालेला वर्ग-4 चा व्यक्ती उपआयुक्त पदापर्यंत पदोन्नती देता येते काय? सन 2003 मध्ये 4 आपत्ये असतांना त्यांना कोणत्या आधारावर कामावर घेण्यात आले आहे. त्याबद्दलची चौकशी करून अहवाल द्यावा मोहम्मद सादीक हे सिडको भागात झोनल अधिकारी होते. तेंव्हा त्यांच्या वादग्रस्त भाष्यामुळे दंगल होण्यासारखी परिस्थिती तयार झाली होती. तसेच झोन कार्यालयावर दगडफेक झाली होती. तरी त्यांना पदोन्नती देवून आस्थापनासारख्या प्रमुख पदावर नेमणुक कोणत्या आधारावर देण्यात आली आहे. उपआयुक्ताची पदोन्नती करतांना शासनाची मान्यता लागते की नाही असाही प्रश्न गौतम जैन यांनी उपस्थित केला आहे.
मी सादर केलेल्या मुद्यांप्रमाणे चौकशी करून मला अहवाल द्यावा. चौकशी पुर्ण होत नाही तो पर्यंत देण्यात आलेली पदोन्नती रद्द करावी नाही तर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गौतम जैन यांनी आपल्या अर्जात दिला आहे.