नांदेड(प्रतिनिधी)-कला मंदिरच्या बाजूला भाजीपाला घेण्यासाठी पायी जात असलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल दोन चोरट्यांनी बळजबरी हिसकावून नेला आहे.
नितीन प्रभाकरराव जोंधळे हे 20 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजेच्यासुमारास कलामंदिरच्या जवळील एक्सीस बॅंकेच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावरून पुढे भाजीपाला घेण्यासाठी पायी जात असतांना दोन अज्ञात आरोपींनी त्यांच्या हातातील 15 हजार 999 रुपयंाचा मोबाईल बळजबरीने हिसकावून नेला आहे. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 26/2025 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार नागरगोजे अधिक तपास करीत आहेत.