दोस्त-दोस्त ना रहा…;डोल्नॉड ट्रम्प जगात आर्थिक युध्द पेटवणार

20 जानेवारी रोजी परंपरेप्रमाणे अमेरिकेचे नुतन राष्ट्र अध्यक्ष शपथ घेतात तो शपथविधी सोहळा पार पडतांना भारताच्या पंतप्रधानाना बोलविण्यात आले नाही तर उद्योगपती मुकेश अंबानी यांना बोलाविण्यात आले. म्हणजे राजाला बोलवले नाही आणि शेटजींना बोलावले असेच म्हणावे लागेल. सोबतच ब्रिक्स देशांनी कोणते नवीन चलन आणले तर मी ते खपवून घेणार नाही असेही सांगितले. सोबतच अमेरिकेत राहणाऱ्या नागरीकांबद्दलच्या नागरीकता कायद्यात सुध्दा मोठा बदल केला आहे. हा बदल एका महिन्यात लागू होईल आणि त्यामुळे भारतातील जवळपास 10 लाख लोकांना परत यावे लागेल याची भिती सुध्दा वाटायला लागली आहे. सर्वच विदेशी लोकांना अमेरिकेने काढून टाकण्याचे ठरविले तर त्यांची कामे कोण करेल हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर सुध्दा उभा राहणार आहे. परंतू आपल्या विचारसरणीप्रमाणे अमेरिकेचे दुसऱ्यांदा झालेले राष्ट्र अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी जगात आर्थिक युध्द छेडण्याचा इशारा दिलाच आहे.
20 जानेवारी रोजी डोनॉल्ड ट्रम यांनी आपल्या अध्यक्षपदाची गोपनियतेची शपथ घेतल्यानंतर बरेच काही घडले आहे. भारताचे काही गोदी पत्रकार अमेरिकेत उभे राहून असे सांगत होते की, शपथग्रहण समारंभात बोलावले नसले तरी त्यांना विशेष करून स्वतंत्रपणे बोलावले जाईल. हे ऐकल्यानंतर त्या पत्रकारांवर हसावे, त्यांचावर राग करावा की, त्यांना महामुर्ख म्हणावे हे कळायला मार्ग नाही. असो भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांनाच आहे आणि जगात सुध्दा अभिव्यक्ती स्वातंत्र्याला महत्व आहे. पण ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत खालच्या पातळीवर न्यायचे की नाही हे ठरविणे प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र विषय आहे.
त्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत ब्रिक्स देशांचा प्रश्न विचारला असतांना डोनॉल्ड ट्रम्प यांनी सांगितलेले शब्द जगात होणाऱ्या तिसऱ्या जागतिक महायुध्दाची मीच रोख थांब करू शकेल असे ते म्हणाले. अमेरिकेला पुन्हा एकदा समर्थ बनवायचे आहे. अमेरिकेचा डंका जगात वाजला पाहिजे असे ट्रम्प म्हणाले. ब्रिक्स देशांमध्ये ब्राझिल, रशिया, भारत, चिन, दक्षीण अफ्रिका, इजिप्त, इथीयोपिया, इंडोनेशिया, इराण आणि द युनायटेड अरब अमिरात या दहा देशांचे हे संघटन आहे. काही महिन्यांपुर्वीच अमेरिकेत झालेल्या ब्रिक्स देशांच्या बैठकीत या संघटनेने जागतिक स्तरावर नवीन करंसी (मुद्रा) तयार करण्याच्या मुद्यावर चर्चा केली होती. तसेच पनामा या सरोवरातून वाहतुक होणाऱ्या मालवाहतुकीवर सुध्दा सामंजस्याचा तोडगा विचारात आणला होता. त्यावर डोनॉल्ड ट्रम्प म्हणाले की, ब्रिक्स देशांनी अशी कोणती नवीन मुद्रा चलनात आणण्याचा प्रयत्न केला तर ते सर्व देश अमेरिकेचे शत्रु असतील. कारण आज जगात देवाण-घेवाणीसाठी डॉलर या चलनाचा वापर होता. तसेच पनामा सवरोवरातून होणाऱ्या मालवाहतुकीवर आम्ही 100 टक्के कर लावू असेही ट्रम्प म्हणाले. यामध्ये सर्वात मोठी अडचण भारताची होणार आहे. कारण युक्रेन-रशिया युध्द सुरू झाल्यानंतर रशियाकडून खरेदी केलेले कच्चे तेल भारत पनामा सरोवरातूनच इतरांना निर्यात करतो. त्यामुळे भारताला मोठा आर्थिक फायदा होतो आणि ट्रम्पने सांगितल्याप्रमाणे घडले तर सर्वात मोठी अडचण भारताची होणार आहे. सामरिक युध्दा पेक्षा आर्थिक युध्द जगाला जास्त महागात पडेल आणि जग जीवंतपणी मरणाकडे जाईल. भारतावर अगोदरच 2 लाख कोटी पेक्षा जास्तीचे कर्ज आहे. इकडे भारतात नरेंद्र मोदी यांचे मित्र गौतम अडाणी आहे तर अमेरिकेत डोनॉल्ड ट्रम्प यांचे मित्र इलॉन मस्क आहेत. दोन्ही देशांमध्ये असलेल्या प्रमुखांकडे ही भांडवलदार मंडळी देशांना कोणत्या दिशेला नेईल याचे गमक न कळण्यासारखे आहे.
अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष पद सांभाळताच डोनॉल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील नागरीक कायद्यात मोठे बदल करण्याच्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. हे कायदे 20 फेबु्रवारी 2025 पासून अंमलात येतील. आजच्या परिस्थितीत अमेरिकेत राहणाऱ्या एकूण भारतीयांमध्ये 20 टक्के गुजराती मंडळी आहे. त्या खालोखाल पंजाब प्रांतातील 12 टक्के नागरीक, तामिनाडू मधील 8 टक्के अशा प्रकारे हा 100 टक्केचा खेळ आहे. अनेक जण आपल्या घरातील महिला गर्भवती असतांना अमेरिकेत जातात. कारण त्या ठिकाणी जन्म झालेल्या बालकाला अमेरिकेचे नागरीकत्व मिळायचे. आता तो का यदा सुध्दा बदलण्यात आला आहे. अभ्यास केला तर डोनॉल्ड ट्रम्पची निवड झाल्यानंतर अमेरिकेला जाण्यासाठी आरक्षीत केलेले अनेक तिकिट रद्द करण्यात आले आहेत. गुजरातमधील तर डंकी मार्गाने अमेरिकेत जाणाऱ्या लोकांपैकी हजारोंचा मृत्यू झालेला आहे आणि आजच्या परिस्थितीत त्यांना अमेरिकेने परत पाठविले तर गुजरातचेच 10 लाख लोक एकदा परत येतील. इकडे भारतात भाषण करतांना भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी बांगलादेशातून भारतात आलेल्यांना घुसखोर म्हणतात आणि त्यांना हाकलायचे आहे. याच्यावर ओरडून ओरडून बोलतात. आता अमेरिकेने त्यांच्याकडील घुसखोर परत पाठविले तर ते कोण आहेत. ते आमचेच बंधू आहेत. का गेले ते तिकडे, काय कमावत आहेत ते, याचा विचार केला तर आपली घरे-दारे, शेती विक्री करून डंकी मार्गाच्या एजंटांना 40 ते 50 लाख रुपये देवून ते छुप्या मार्गाने अमेरिकेत जातात. अमेरिकेत हीच मंडळी ट्रक चालक, शेतमजुर आणि औद्योगिक मजुर म्हणून काम करतात. त्यांना तेथे दर महिना 2 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळतात. भारतात तर याची काही सोय नाही. खा.राहुल गांधी अमेरिकेत गेल्यानंतर या लोकांना भेटले आणि बोलले. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तर राहुल गांधींना देशद्रोही म्हटले जाते. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र असणारे डौनॉल्ड ट्रम्प आता दोस्त दोस्त ना रहा…या पध्दतीने वागत असतील तर भविष्यातील भारताचे भविष्य अंधारतच दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!