नवीन न्यायालय इमारत परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्यांची उभारणी करावी-मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात तयार होणाऱ्या न्यायालयीन इमारतीच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णाकृती प ुतळे बसविण्यात यावेत अशी मागणी करणारा अर्ज दिलीप कुलकर्णी यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूसह अनेकांना दिले आहेत.
नांदेड शहरात नव्याने तयार होणाऱ्या नुतन न्यायालयीन इमारत परिसरात महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसवावेत अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे. नांदेडमध्ये रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत. पण नवीन नांदेड भागात या दोन्ही महापुरूषांचे पुतळे असणे आवश्यक आहे. न्यायालयीन नवीन इमारती तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी दररोज पाच हजार लोक ये-जा करतील आणि या दोन्ही महापुरूषांचे दर्शन त्यांना घडत राहिल. या अर्जाच्या प्रति त्यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे सरन्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा न्यायाधीश नांदेड, अध्यक्ष बार कॉन्सील महाराष्ट्र ऍन्ड गोवा, नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ऍड. गोदमगावकर, आय.जी.नांदेड, पोलीस अधिक्षक नांदेद्व तहसीलदार नांदेड, खा.अशोक चव्हाण, खा.अजित गोपछडे, खा.रविंद्र चव्हाण, नांदेड दक्षीणचे आमदार आनंदराव बोंढारकर यांना दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!