नांदेड : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छूक पात्र बचतगटांनी ऑनलाईन अर्ज http://mini.mahasamajkalyan.in या संकेत स्थळावर भरुन त्याची सत्यप्रत 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत समाज कल्याण सहायक आयुक्त नांदेड या कार्यालयात सादर करावी, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णयान्वये 8 मार्च 2017 रोजी निश्चित करण्यात आल्या आहेत. हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. Kanthak Suryatal Post Views: 710 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड येथे राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे शानदार उद्घाटन माळाकोळी पोलीस 8 वर्षीय बेपत्ता बालिकेचा शोध घेत आहेत