दिव्यागाने सहाय्यक आयुक्तांची हुबेहूब रेखाटलेली प्रतिमा दिली भेट
नांदेड (प्रतिनिधी)-बळीरामपूर येथील रहिवासी असलेल्या सिद्धार्थ जमदाडे यांच्या घरी सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यांनी भेट देऊन दिव्यांग यांची विचारपूस करून भेट दिली त्यावेळेस सिद्धार्थ जमदाडे दिव्यांग यांनी सहाय्यक आयुक्तांची हुबेहूब प्रतिमा रेखाटून त्यांना भेट दिली .
शेषराव जमदाडे यांनी पत्रकार क्षेत्रामध्ये काम करून आपले कुटुंब बळीरामपूर येथे स्थायिक केले त्या ठिकाणी छोटसं घर बांधून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता त्यांना तीन आपत्य होते त्यापैकी सिद्धार्थ जमदाडे हा दोन नंबरचा मुलगा होता शिक्षणामध्ये हुशार व बुद्धिवान असलेल्या सिद्धार्थ जमदाडे हा बारावीच्या नंतर शिक्षण घेत असताना आंब्याच्या झाडावर जाऊन आंबे तोडत असताना अपघात होऊन दोन्ही पायाने अपंग झाला.
बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारिता शिक्षण घेण्यास सुरुवात केली परंतु नीतीचा खेळ वेगळाच आंबे तोडायला झाडावर गेल्याच्या नंतर झाडावरून पडून दोन्ही पाय निकामी झाले चार दिवसांवर ठरलेले लग्न ही मोडून गेले त्यामुळे दिव्यांग सिद्धार्थ जमदाडे हे कायमचे दिव्यांग झाले. दिव्यांग असल्याचे खचून न जाता दिव्यांगावर मात करत आपल्या कलेचे सादरीकरण त्याने चित्रकला ही अवगत केली अनेक आमदार खासदार जिल्हाधिकारी वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रतिमा हूबेहूब रेखाटण्याची कला त्यांनी अवगत केली. नुकतेच समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिंनगिरे यांची प्रतिमा त्यांनी हुबेहूब रेखाटली. सहाय्यक आयुक्तांनी दिव्यांगाची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन बळीरामपूर येथे भेट देऊन कुटुंबाची विचारपूस केली त्यावेळी मात्र दिव्यांग बांधव सिद्धार्थ जमदाडे यांची संपूर्ण जीवन गाथा सहाय्यक आयुक्तांनी ऐकून घेतली. चार दिवसांवर आलेले लग्न अपुरे राहिले. पत्रकार होण्याची इच्छाही अपुरीची राहिली. तीन भावांपैकी एक भाऊ कायमचा निघून गेला एक भाऊ मिस्त्री काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. आई म्हातारी रोज मंजुरी करून कुटुंबाला मदत करते अशी दिव्यांग सिद्धार्थ जमदाडे यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मीनगिरे यांची हुबेहूब प्रतिमा त्यांनी रेखाटून यावेळी त्यांना भेट दिली
राज्य शासनामार्फत दिव्यांगासाठी असणाऱ्या विविध योजना सिद्धार्थ जमदाडे पर्यंत पोहोचून त्यांना मदतीचा हात देण्याचे सहाय्यक आयुक्त यांनी आश्वासनही सिद्धार्थ जमदाडेला दिले. यावेळी बेरोजगार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष तथा पत्रकार राहुल साळवे ज्येष्ठ पत्रकार गंगाधर गच्चे आदींची उपस्थिती होती.