नांदेड , (प्रतिनिधी)- प्रभातनगर येथील ज्येष्ठ नागरिक सुभद्राबाई पंडितराव सावंत यांचे आज दुपारी १ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या. उद्या दि. १८ जानेवारी सकाळी ११ वाजता नांदेड येथील गोवर्धनघाट स्मशानभूमीत दिवंगत सुभद्राबाई पंडितराव सावंत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत आणि उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दीपक सावंत यांच्या त्या मातोश्री होत. दिवंगत सुभद्राबाई सावंत यांच्या पश्चात पाच मुले, तीन मुली, सुना, जावई, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.
More Related Articles
नांदेड जिल्हयात सोमवार पासून ॲग्रिस्टॅक मोहिमेस सुरुवात
#१६ तालुक्यात लोकप्रतिनिधींच्या – वरीष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत एकाच वेळी उदघाटन नांदेड :-कृषि क्षेत्रात…
डंकीन परिसरात अनोळखी मयताचे मारेकरी पोलीसांनी 24 तासात पकडले
आरोपी शाहरुख उर्फ घोडेवाला शेख इकबाल नांदेड(प्रतिनिधी)-डंकीन परिसरात अनोळखी युवकाचा खून झालेल्या प्रकरणात पोलीसांनी शाहरुख…
गंगाखेड पोलीसांनी हरवलेले 3 लाख रुपये काही मिनिटांमध्ये शोधून मालकांना परत केले
नांदेड(प्रतिनिधी)-गंगाखेड येथे राहणारे पती-पत्नी 3 लाख रुपये रोख रक्कम घेवून जात असतांना त्यांच्या हातातील गुलाबी…
