नांदेड(प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील सहकारी 21 राजकीय पक्षांना पत्र लिहुन ईव्हीएम विरुध्द लढा देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या फेसबुक पेजवर प्रसारीत केलेल्या माहितीनुसार त्यांनी देशातील ईव्हीएम विरुध्द लढा देण्यासाठी आणि निवडणुक आचार संहिता 1961 मध्ये नव्यानेच बदल केल्याच्या विरोधात लढाई करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ऍड.आंबेडकरांना विश्र्वास आहे की, जर ईव्हीएम विरुध्द लढा लढायचा असेल आणि निवडणुक प्रक्रियेत पारदर्शकता आणायची असेल तर प्रत्येक राजकीय पक्षाने एकत्र येवून एकत्रित शक्ती तयार करणे आवश्यक आहे.
ऍड.प्रकाश आंबेडकरांनी पुढील 21 राजकीय पक्षांना हे पत्र पाठविले आहे.
ईव्हीएमविरुध्द सर्वच राजकीय पक्ष बोलत आहेत. परंतू त्यासाठी एकत्रीकरणाची हाक योग्य आहे. राज्यात आणि देशात सुरू असलेल्या ईव्हीएम घोटाळ्याममध्ये झालेल्या मतदानापैकी मोजतांना मतदान वाढवून आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम सोबत व्हीव्हीव्ही पॅडची मोजणी करण्याचे आदेश दिल्यानंतर सुध्दा निवडणुक आयोगाने त्या आदेशाला फाटा दाखवत ईव्हीएममधील डाटा डिजिटल करून फक्त मॉकपोल करून दाखवले. तसेच अखिलेश यादव यांनी निवडणुक मतदान केंद्रांवरील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची रेकॉर्डींग मागितली असता त्या कायद्यात अचानकच बदल करून देता येणार नाही अशी भुमिका निवडणुक आयोगाने घेतली आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीत जो काही घोटाळा निवडणुक आयोग करत आहे. त्यावर एकाप्रकारे ते शिक्का मोर्तबच झाले आहे. म्हणून सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येवून हा लढा देणे अत्यंत आवश्यक आहे.