नांदेड(प्रतिनिधी)-17 डिसेंबर रोजी लोकसभेत भारताचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज कल फॅशन हो गया है। आंबेडकर.. आंबेडकर.. आंबेडकर.. आंबेडकर.. आंबेडकर.. आंबेडकर… असे उच्चा करून विरोधकांना कोंडीत पकडण्याचा केलेला प्रयत्न आता त्यांच्याच अंगलट आला आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल केलेल्या या वक्तव्याप्रती सुलतानपुर उत्तरप्रदेश एमपी/एमएलए न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेत 15 जानेवारी रोजी राम खिलावन या याचिकाकर्त्याची साक्ष झाली. त्यांनी आपल्या साक्षीत 17 डिसेंबर 2024 चे अमित शाह यांचे वक्तव्य पेनड्राईव्हमध्ये न्यायालयात सादर केले. या पुढे आता 23 जानेवारी रोजी इतर दोन साक्षीदारांचे जबाब न्यायालय नोंदवून घेईल. या न्यायालयात शुभम वर्मा हे न्यायाधीश आहेत. अमित शाह यांच्या बोलण्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा किती मोठा अपमान झाला आहे. हे सांगत असतांना राम खिलावन यांनी एवढ्या वेळेस देवाचे नाव घेतले असते तर सात जन्मापर्यंत स्वर्ग प्राप्त झाला असता असे सांगितले. ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीला मजबुत ठेवण्यासाठी तयार केलेले संविधान आणि त्याच संविधानावर आधारीत भारताची प्रगल्भ लोकशाही चालते त्या महान व्यक्तीचा अपमान करून अमित शाह यांनी त्यांच्यावर श्रध्दा ठेवणारे, त्यांचे अनुयायी, त्यांनाच आपला देव मानणारे अशा सर्वांचा अपमान झाला आहे आणि यासाठी अमित शाहवर कार्यवाही व्हावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणी राम खिलावन यांचे वकील जयप्रकाश यांनी सांगितले की, न्यायालयात 23 जानेवारी रोजी आलेल्या साक्षींच्या आधारवर न्यायालयात जामीन घेण्यासाठी अमित शाहला यावेच लागेल.
याबाबत वृत्तविश्लेषण करतांना मुद्दा या युट्युब चॅनलचे स्वप्नीत यांनी सांगितले की, भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या घरी गणेश पुजा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले. त्यानंतर व्यवस्थेवरचा विश्र्वास कमी होत गेला होता. पण सुलतानपूरच्या प्राथमिक न्यायालयाने दाखवलेली हिम्मत म्हणजे आजही न्याय व्यवस्था जिवंत आहे असे म्हणावे लागेल.प्राथमिक न्यायालयाने आज घेतलेला निर्णय काळ्या दगडावरची रेघ ठरेल असे वाटते. या प्रकरणाचा निर्णय पुढे जाईल तेंव्हा निर्णय बदलू शकेल. पण प्राथमिक न्यायालयाने केलेली ही कार्यवाही अभिनंदनीय आहे.
काही वर्षांपुर्वी मोदी या नावाचा वापर करून विरोधी पक्ष नेता खा.राहुल गांधी यांनी भारतातून बॅंकेचे पैसे बुडवून पळून गेलेल्या निरव मोदीचा उल्लेख केला होता. याप्रकरणी सुध्दा प्राथमिक न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी झाली म्हणून खटला दाखल करून घेतला होता आणि खा.राहुल गांधींना 2 वर्षाची शिक्षा पण दिली होती. त्यांची शिक्षा जाहीर होताच 24 तासात त्यांचे शासकीय निवासस्थान केंद्र सरकारने रिक्त करून घेतले होते. पण हे प्रकरण उच्च न्यालयात आल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला होता. मग राहुल गांधी विरुध्द असा खटला होवू शकतो तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विरुध्द का नाही असा प्रश्न आपल्या विश्लेषणात स्वप्नीत यांनी उल्लेखीत केला आहे.
डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या बद्दल अमित शाह बोलले आणि त्यावेळी सर्वांनीच त्याचा निषेध व्यक्त केला होता. पण राजकीय खेळी करतांना भारतीय जनता पार्टीने डॉ.बी.आर आंबेडकरांचा मुद्दा मागे पाडून दुसरेच अनेक मुद्दे समोर आणले आणि त्यामुळे 17 डिसेंबरचे अमित शाह यांचे राज्यसभेतील वक्तव्य मागे पडले होते. पण आता सुलतानपुर न्यायालयाने घेतलेल्या खटल्यानंतर 17 डिसेंबरचे वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे.
सोर्स: मुद्दा-स्वप्नीत(संबंधीत व्हिडीओ)