नांदेड(प्रतिनिधी)-बाहेरगावहून नांदेडमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांची ही मोठी संख्या त्यांना लुटणाऱ्यांसाठी एक पर्वणी आहे. आता एक गुन्हा पोलीसांसह तिन जणांवर दाखल झाल्यानंतर या घटनेला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. नाही तर ते पुर्वीपासून चालत आलेले विद्यार्थ्यांना त्रास देण्याचे प्रकार कायम सुरूच राहतील असे आम्हाला वाटते.
5 जानेवारी रोजी एका 18 वर्षीय विद्यार्थ्याला पोलीसांसमक्षच पोलीससह इतर तिन जणांनी जबर मारहाण केली. तो विद्यार्थी राहतो. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत. त्याला आपल्या वस्तीगृहातून उचलून नेऊन अशोकनगर, गोकुळनगर, आसना नदीच्या परिसरात भरपूर मारहाण करण्यात आली. मारहाण करणारा पोलीस त्याला विचारत होता. की तु दुचाकी आणि सोन्याची चैन चोरली आहे. खरे तर तो पोलीस आरसीबी पथका कार्यरत आहे. पण तो तपास करू लागला. तपास करण्यासाठी कोणता गुन्हा होता. याची काही माहिती मिळाली नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या विद्यार्थ्याला वस्तीगृहात मारहाण झाली. त्या मारहाणीचा व्हिडीओ बनविण्यात आला. तो व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांने घडलेला प्रकार आपल्या वडीलांना सांगितला आणि त्यानंतर प्रथमेश पुरी याने तक्रार दिली. शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पण अडचण असते की, आई-वडीलांना माहित झाले तर आपले शिक्षण बंद होईल. म्हणून अनेकवेळेस वस्तीगृहातील रॅगींग असेल किंवा समाजकंटकाकडून होणारी मारहाण आणि त्यांचे पैसे लुटने असे प्रकार विद्यार्थी सहन करतात. आम्ही अनेक विद्यार्थ्यांना पैसे लुटले गेल्यामुळे इतरांकडे मदतीची याचना करून आपली भुक भागविल्याचे पाहिले आहे.
प्रथमेश पुरीला मारहाण करणाऱ्या पोलीसाचे नाव क्षितिज कांबळे आहे. त्याच्यासोबत मारहाण करणारा आकाश सावंत हा एका खाजगी बॅंकेत नोकरीला आहे. तसेच तिसरा मारहाण करणारा श्रावण आहे. यासंदर्भाने भाग्यनगर पोलीस ठाण्यात पोलीसासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार काही आजचाच नाही. नांदेडमध्ये शिकवण्यांचे प्रस्त वाढल्यानंतर असे अनेक प्रकार घडलेले आहेत. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एका युवतीचा खून पण झालेला आहे. श्रीनगरमध्ये एका वस्तीगृहात सुध्दा एका युवतीचा खून झाला होता. आम्ही ज्या विद्यार्थ्यांकडून पैसे लुटले जातात त्यांना धमक्या दिल्या जातात आणि आर्थिक फायदा करून घेतला जातो अशा प्रकारची एक मोठी मंडळी कार्यरत आहे. काही दिवसांपुर्वी याच श्रीनगर भागामध्ये एक गुंड हातात तलवार घेवून फिरत होता. त्याला पकडून एका पोलीसाने आपली वाहवाई करून घेतली. पण ज्या ठिकाणी पोलीसाने त्या गुंडाला पकडले होते. त्याच जागेच्या 50 पाऊलांपुढे किंवा विरुध्द दिशेच्या 200 पाऊलांपुढे असे अनेक प्रकार घडत असतात. त्यांच्यावर कधीच कार्यवाही झाल्याचे आम्हाला माहित नाही. काही पोलीसांना आम्ही याची सुचना दिली पण उशीरा पोलीस आम्हाला सांगतात आम्हाला कोणाच्या सुचनेची गरज नाही. कारण आम्ही सक्षम आहोत. पण पोलीसच अत्याचार करत असल्यामुळे त्यांच्या सक्षमतेवर प्रश्न निर्माण केला तर तो पित्तपत्रकारीता ठरते. एक विधवा महिला दोन वर्षापासून माझ्यावर पोलीसाने अत्याचार केला हे सांगत गावभर उंबरठे झिजवत आहे. तिलाही काही न्याय मिळला नाही.
पोलीसांच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करणाऱ्या पोलीसांमधील काही पोलीस गुन्हा दाखल झालेल्या पोलीसापेक्षा जास्त अत्याचार करतात. याचा पुरावा कुठून द्यावा. ते तर एका सिक्रेट रुममध्ये चालते. आम्हाला प्रथमेश पुरीवर झालेल्या अन्याच्या ज्वालामुखीतून हे सर्व लिहिण्याची इच्छा झाली आहे. कारण ते जनतेपर्यंत आम्हाला प ोहचवायचे आहे, त्या पालकांपर्यंत पोहचवायचे आहे ज्यांची मुले आणि मुली नांदेडमध्ये शिक्षण घेत आहेत.