नांदेड(प्रतिनिधी)-11 जानेवारी रोजी माळटेकडी पुलाखाली सापडलेल्या 38 वर्षीय व्यक्तीच्या खूनाचा उलगडा नांदेड स्थानिक गुन्हा शाखेने करून एका 27 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. किरकोळ कारणातून झालेल्या वादानंतर हा खून करण्यात आला होता.
दि.11 जानेवारी रोजी माळटेकडी पुलाजवळ शेख सिद्दीक शेख सादीक (38) या व्यक्तीचे प्रेत सापडले. त्याच्यावर धार-धार शस्त्राने हल्ला केल्यामुळे त्याचे लिव्हर पम्चर झाले होते आणि त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत मयत शेख सद्दीकचे भाऊ शेख अमिर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 12/2025 दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक गणेश चव्हाण हे करीत होते.
जिल्ह्यात घडलेल्या कोणत्याही गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे अधिकार असलेल्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार रविशंकर बामणे, राहुल लाठकर, तिरुपती तेलंग, सिध्दार्थ सोनसळे, राजेंद्र सिटीकर आणि दिपक ओढणे यांनी आपल्या तांत्रिक कौशल्याच्या आधारावर आणि खबऱ्यांच्या सहाय्याने मिल्लतनगर भागातील शेख मोईन शेख महेबुब (27) यास पकडले. त्याने अत्यंत किरकोळ वादातून मी शेख सिद्दीकचा खून केल्याची दिली आहे.