नांदेड(प्रतिनिधी)-शासकीय विभागांवर एखाद्या विषयी चर्चा केली तर ते आमचे काम नाही, ती जबाबदारी आमची नाही असे म्हटले जाते. सर्वात मोठे काम पोलीस विभागाचेच आहे. कारण पोलीस हा एक असा विभाग आहे की, ज्यांच्या कार्यालयातील दरवाज्याला कधीच कुलूप लावले जात नाही. तरीपण ते तर आपले हात झटकण्यात सर्वात पुढे असतात.
काही दिवसांपुर्वी व्हाटसऍप संकेतस्थळावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनुसार एक ट्रक नांदेड ते भोकर रस्त्यावर अत्यंत भरधाव वेगात धावत आहे. या ट्रकच्या व्हिडीओ घेण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कोणताही नोंदणी क्रमांक लावलेला दिसत नाही. इतकेच नव्हे तर या ट्रकमध्ये दिसणारे ट्रकच्या मागील भागातील सुट्टे भाग गंजलेल्या अवस्थेत आहेत. या ट्रकचे टायर पाहिले असता हे टायर सुध्दा आपली सेवा पुर्ण केलेले दिसत आहेत. या ट्रकचा डाव्या बाजूचा बॅक व्युह मिरर दिसत आहे. त्यात एक माणुस सुध्दा त्या गाडीत बसलेला दिसतो आहे. गाडीच्या मागील दार बंद करण्यासाठी बनावट प्रकारचे एक लॉक स्टिम दिसत आहे. जे ट्रकसोबत येतो तो लॉक नाही तर नंतर बनवलेला लॉक आहे. या संदर्भाने दिवसा धावणाऱ्या गाडीची दखल होत नाही.
कोणाकडे तक्रार करावी याची. या त्रासाने थकलेल्या त्या व्यक्तीने या धावत्या ट्रकचा व्हिडीओ घेवून सोशल मिडीयावर प्रदर्शित केला आहे. या गाडीने एखाद्या व्यक्तीला धडक दिली, गाडीला धडक दिली, हिच गाडी कोठे तरी उलटली तर मग सर्व काम पोलीस विभागाच करते. अशा परिस्थितीत बिना क्रमांकाच्या धावणाऱ्या गाडीची सहज तपासणी का होत नाही. नांदेड शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर महामार्ग सुरक्षा पथक आहेत. अनेक जागी टोलनाके आहेत. तरी पण या ट्रकला विचारलेले नाही. परिवहन विभाग तर आपल्या विद्युत वेग पथकांसाठी प्रसिध्द आहे, अनेक ठिकाणी पोलीसांची इंटरस्पेटर वाहने आहेत. पण कोठेच या बिनानंबरच्या गाडीची दखल होत नाही आणि साध्या प्रकारे एखाद्या गाडीला पकडल्यानंतर त्या गाडीतील चालकाचे ड्रायव्हींग लायसन्स चुकीने घरी राहिले असेल तरी पण त्याला दंड भरावा लागतो. मग असे बिनाव नोंदणीक्रमांकांचे ट्रक कोणाच्या आशिर्वादाने सार्वजनिक रस्त्यांवर धावत आहेत. हा एक शोध विषय आहे.