नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात प्रत्येक विद्युत खांबावर वायफाय, डिश, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वायर मोठ्या प्रमाणात गुंडाळून ठेवल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता दिसत आहे. या संदर्भाने आपले विवेचन सरदार राजेंद्रसिंघ नौनिहालसिंघ शाहु यांनी व्हाटसऍपवर प्रसारीत केले आहे.
नांदेड शहरात अनेक विद्युत खांबावर दुसऱ्या कामांचे अर्थात वायफाय, सीसीटीव्ही, डीश यांचे वायर बंडलस् लटकवलेले आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना नाकारता येणार नाही. शहराच्या कोणत्याही भागातून जातांना एखाद्या विद्युत खांबाकडे पाहिले असतांना त्याच्यावर अंदाजे 400-500 फुट वायर लटकवलेले दिसतात. बऱ्याच जागी हे वायर हाय व्होल्टेज असलेल्या विद्युत तारांच्याखाली आहेत. हाय व्होल्टेज तारांना हे वायर काही कारणांनी चिटकले तर मोठी दुर्घटना अत्यंत दु:खदायी ठरणार आहे. त्यामुळे याबाबत संबंधीत विभागाने त्वरीत प्रभावाने पाऊले उचलून त्यावर नियंत्रण आणावे अशी मागणी राजेंद्रसिंघ शाहु यांनी केली आहे. मागे काही महिन्यांपुर्वी चिखलवाडीमध्ये अशाच प्रकारे बेकायदेशीर लटकविलेल्या वायरला आग लागली आणि मोठी दुर्घटना होण्याअगोदरच अग्नीशमन विभागाने ती आग आटोक्यात आणली होती. विशेष: करून गुरुद्वारा चौरस्ता आणि दक्षीण-उत्तरेकडे जाणारा रस्ता हा नेहमीच भाविकांनी भरलेला असतो. त्यामुळे या ठिकाणी घडलेली दुर्घटना वाईट स्वरुपाची असेल. म्हणून या सर्व अवैधपणे शासनाच्या विद्युत खांबावर लावण्यात आलेली वायर बंडले काढावी अशी मागणी राजेंद्रसिंघ शाहु यांनी केली आहे.