नांदेड(प्रतिनिधि ) :- ‘ आपल्या सभोवतालची माणसे वाचा म्हणजे तुमचा अभिनय प्रगल्भ होईल ‘ असे प्रतिपादन प्रकाश बाबा आमटे ,हेमलकसा,हलाल,पाणी,आशियाना,फ्रेंडशिप डॉट कॉम,यशवंतराव चव्हाण आदी चित्रपट आणि सुप्रसिध्द मालिकांचे सिने कलावंत कुणाल गजभारे ह्यांनी केले.
आई क्रिएशन्स,नांदेड आणि सूर्यमुद्रा फाऊंडेशन,नांदेड आयोजित ‘ प्राचार्य अमृतराव भद्रे आंबेडकरवादी नाट्य प्रशिक्षण शिबिरात ‘ सिनेमा,नाटक आणि मालिका ‘ ह्यातील विविधरंगी अभिनयातील फरक सांगताना त्यांनी अनेक प्रात्यक्षिके करत, शिबिरार्थीना सोबत घेऊन अनेक व्यक्तिरेखा उभ्या केल्या.सिनेमात डोळे हा अभिनयाचा मुख्य भाग आहे असे ते म्हणाले.त्यांनी विद्यार्थ्यांसोबत दिलखुलास गप्पा मारत त्यांना दिशा दिली.
ह्या सत्राच्या अध्यक्षस्थानी कु.सांची गजभारे ह्या होत्या.प्रारंभी सांची गजभारे ह्यांनी कुणाल गजभारे ह्यांचे स्वागत केले.तर सांची गजभारे ह्यांचे स्वागत शिबीराचे मुख्य संयोजक डॉ.विलासराज भद्रे ह्यांनी केले.ह्याप्रसंगी अनेक शिबिरार्थी आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह्या सत्राचे सूत्रसंचालन डॉ.भद्रे ह्यांनी केले तर आभार आनंद कांबळे यांनी मानले.ह्या सत्राच्या यशस्वितेसाठी कृष्णा गजभारे,विशाल कदम,संकेत पाईकराव, अर्णव गोल्हेरे,वंश सोनकांबळे आदींनी परिश्रम घेतले .