नांदेड(प्रतिनिधी)-आज सुर्योदय झाल्यानंतर माळटेकडी उड्डाणपुलाच्या खाली एका 38 वर्षीय व्यक्तीचे प्रेत सापडले. त्याच्या पोटात आणि छातीवर तिक्ष्ण हत्याराने वार केलेला आहे. ज्यामुळे मयताचे लिव्हर पम्चर झाले आहे. या प्रकरणी अज्ञात कारणासाठी अज्ञात मारेकऱ्याविरुध्द शेख सिद्दीक शेख सादीकचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार आजचा सुर्योदय होताच माळटेकडी उड्डाणपुलाच्याखाली शेख सिद्दीक शेख सादीक (38) या व्यक्तीचे प्रेत सापडले. त्याच्या पोटात आणि छातीवर तिक्ष्ण हत्याराने वार केलेले होते. त्यांच्या नातलगांनी सांगितले की, ते काल रात्री एका लग्न समारंभात जेवण करण्यासाठी गेले होते. पण त्यांच्या मृतदेह सापडला आहे. विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 12/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक गणेश चव्हाण आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार रितेश कुलथे अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणात कारण आणि मारेकरी शोधण्याचे आवाहन पोलीसांसमक्ष आहे.