नांदेड(प्रतिनिधी)-तामसा पोलीसांनी एका चोरट्याला पकडून त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी गाड्या, 30 हजार रुपये किंमतीच्या जप्त केल्या आहेत.
सन 2023 मध्ये पांडूरंग गोमाजी भुरके या शिक्षकांची दुचाकी गाडी 23 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांच्या घरासमोरून तामसा येथून चोरीला गेली होती. त्याबाबत तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 126/2023 दाखल केला होता. तामसा येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक कमल शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक बालाजी नरवटे, पोलीस अंमलदार शामसुंदर नागरगोजे, प्रकाश कबले, डोरले, महिला पोलीस अंमलदार साखरवाडे यांनी दिवशी (बु) ता.भोकर येथून नवीन नारायण गुद्देवार (32) याला ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने पांडूरंग भुरके यांची दुचाकी तर चोरलीच होती. पण त्याच्याकडून त्या दुचाकीसह एकूण 7 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकी गाड्यांची किंमत 3 लाख रुपये आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार नागरगोजे हे करीत आहेत.