नांदेड(प्रतिनिधी)-स्वामीच्या मार्गदर्शनात रेल्वे रुळांच्या पलिकडे मटका बुक्या सुरू आहेत. याचा आज आम्ही चलचित्र पुरावा प्राप्त केला. म्हणजेच परवाच्या दिवशी मटका बुक्कीवर धाड टाकून कार्यवाही पोलीसांनी केली. तरीही त्यानंतर सुध्दा मटका सुरूच आहे.
28 डिसेंबर 2024, 2 जानेवारी 2025 या दोन दिवशी वास्तव न्युज लाईव्हने मटका बुक्यांबद्दलच्या बातम्या प्रसारीत केल्या होत्या. समाजासमोर सत्य मांडण्यासाठीच आमची मेहनत नेहमी असते. त्यानंतर 2 जानेवारी, 3 जानेवारी आणि 9 जानेवारी रोजी मटका बुक्यांवर कार्यवाही करून पोलीसांनी आपली एक जबाबदारी पुर्ण केली. परंतू आज सकाळी एका मटका बुक्कीची व्हिडीओ चित्रफित प्राप्त करून आम्ही पुन्हा हे सादर करू इच्छितो की, आजही मटका बुक्या सुरू आहेत. आम्ही तयार केलेला व्हिडीओ हा अग्नीशमन दलाच्या शेजारी चालणाऱ्या मटका बुक्कीचा आहे. इतरही ठिकाणचे व्हिडीओ प्राप्त करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करत आहोत.
व्हिडीओ…