नांदेड(प्रतिनिधी)-भिक मागण्याचा व्यवसाय असणाऱ्या एका महिलेच्या घरात सोने, चांदी आणि रोख रक्कम अशी 49 हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी झाल्याचा प्रकार पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या हद्दीत घडला आहे. कॅनॉल रोड नांदेड येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 78 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या हद्दीत राहणाऱ्या आणि काम भिक मागण्याचे करणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 8 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 4.45 वाजेदरम्यान तिच्या घराच्या खिडकीची जाळी काढून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश करून शयन कक्षामधल्या लोखंडी पेटीचे कुलूप तोडून, पेटीतील स्टीलच्या डब्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 49 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 9/2025 नुसार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार बंडेवार हे करीत आहेत.
कॅनॉल रोडवर ईस्क्वेअरजवळ घर असणाऱ्या गोविंद उत्तमराव सोेळंके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 डिसेंबर 2024 च्या दुपारी 1.30 ते 5 जानेवारी 2025 च्या सायंकाळी 5.30 वाजेदरम्यान त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून कोणी तरी चोरट्यांनी 1 लाख 78 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 15/2025 नुसार दाखल केली आहे. तपास पोलीस अंमलदार जाधव हे करीत आहेत.