छत्तीसगड राज्यातील विजापूर जिल्ह्यात पत्रकाराची हत्या झाल्यानंतर त्या विजापूरच्या पोलीस अधिक्षकांनी तो सेफ्टीक टॅंक खोदण्यास परवानगी दिली नव्हती. त्यानंतर बरेच पत्रकार त्या परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे गेले. तेंव्हा ते सेफ्टीक टॅंक फोडण्यात आले आणि त्यात पत्रकार मुकेश चंद्राकरचे प्रेत सापडले. यावरून पत्रकारांना पोलीस कशी वागणूक देतात याचे हे उदाहरण आहे.
1 जानेवारी रोजी मुकेश चंद्राकरला आपल्या मालकीच्या बॅडमेंटन कोर्टवर बोलावून सुरेश चंद्राकर आणि त्याच्या हस्तकांनी त्याचा खून केला. मुकेश चंद्राकर हा नक्षलवादी प्रभावीत भागात जन्मलेला युवक आहे. त्या भागातील काही घरांना विस्थापीत करण्यात आले. त्यात आपली आई आणि आपला भाऊ यांच्यासोबत मुकेश चंद्राकर शरणार्थी शिबिरांमध्ये आपल्या बालपणाचा वेळ घालविला. त्या अगोदर त्यांच्या वडीलांचा मृत्यू झाला होता. पुढे आई अंगणवाडी सेविका झाल्या आणि युवा अवस्थेत आल्यावर मुकेश चंद्राकरने आपल्या भविष्यातील जीवनाला पाहत पत्रकारीता निवडली. त्यांनी अशा अनंत स्टोरी तयार केल्या. ज्यामुळे नेते, अधिकारी, छत्तीसगड शासन, ठेकेदार, अनेक प्रकारचे माफीया त्यांच्यावर नाराजच राहत असत. त्यांच्या जीवनातील सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की, एका पोलीस अंमलदाराला नक्षवाद्यांनी आपल्या ताब्यात ठेवले असतांना मुकेश चंद्राकरने आपल्या हिम्मतीवर त्या पोलीसाला परत आणले होते. पण पुढे पोलीस त्यांच्या बातम्यांमुळे त्यांचे विरोधकच होत गेले.
दि.1 जानेवारी 2025 रोजी मुकेश चंद्राकार हा रात्री घरी परत आला नाही याची तक्रार देण्यासाठी पत्रकार असलेल्या त्यांच्या बंधूने पोलीस ठाणे गाठले तेंव्हा त्याची मस्करी पोलीस करत होते. येईल ना, कुठे तरी गेला असेल, आम्हाला काय एवढेच काम आहे काय असे ते बोलू लागले. त्यानंतर 4 तासांनी मुकेश चंद्राकरची मिसींग तक्रार दाखल केली. ठाणेदाराने आपल्या पोलीस अधिक्षकांना ही माहिती दिली. त्यानंतर त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन तपासत-तपासत पोलीस आणि मुकेश चंद्राकरचे नातलग सुरेश चंद्राकरच्या बॅडमिंटन कोर्टवर पोहचले. त्यानंतर मुकेश चंद्राकरचा फोन ऑन झाला नाही आणि त्याचे लोकशनही बदलले नव्हते. म्हणजे हा पहिला धागा होता. ज्यावरून शेवटी मुकेश चंद्राकर या ठिकाणी होता असे सांगता येते. त्या बॅडमिंटन कोर्ट परिसराची संपुर्ण तपासणी केली. परंतू काहीच शोध लागला नाही. तेंव्हा नातेवाईकांनी आणि पत्रकारांनी अशी मागणी केली की, या बॅडमिंटन कोर्टवर असलेला सेफ्टीक टॅंक नवीन दिसतो आणि त्याला नव्यानेच गिलावा केलेला आहे. त्याला फोडून पाहु या बाबत ठाणेदाराने विजयापुरच्या पोलीस अधिक्षकांना विचारणा केली आणि पोलीस अधिक्षकांनी तो सेफ्टीक टॅंक फोडण्यास नकार दिला. तेंव्हा अनेक पत्रकार त्या पोलीस परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे गेले आणि मग त्यांनी तो सेफ्टीक टॅंक फोडण्याची परवानगी दिली. त्यात सापडले मुकेश चंद्राकरचे प्रेत. पोस्टमार्टम अहवालाप्रमाणे त्याची 5 हाडे तुटलेली होती, त्याच्या डोक्यात 15 फॅक्चर होते, त्याच्या लिव्हरचे 4 तुकडे झाले होते. त्याचे हृदय फाटले होते, त्याची कॉलर बोन तुटली होती आणि त्याची मान सुध्दा तुटलेली होती. यावरून त्याची हत्या किती निघृनपणे, बेदरकारपणे करण्यात आली होती हे दिसते.
सरकार कोणतेही असो प्र्रत्येक जागी सुरेश चंद्राकर, विजयापुरचे पोलीस अधिक्षक अशा प्रकारची व्यक्तीमत्वे जीवंतच आहेत. सुरेश चंद्राकर हा कॉंगे्रस कार्यकर्ता आहे. त्याला कॉंग्रेस पक्षाच्यावतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये जबाबदारी देण्यात आली होती. ती कोणती माहित नाही पण तो महाराष्ट्रात आला होता. ऑगस्ट 2024 मध्ये मुकेश चंद्राकरला एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने धमकी सुध्दा दिली होती. त्याबाबत त्याने आपल्या वरिष्ठ पत्रकारांना विचारून काही होईल काय अशी विचार केली होती. पण दुर्देवाने चार महिन्यातच मुकेश चंद्राकरचा झालेला खून आणि त्याला लपविण्यासाठी तयार करण्यात आलेली एलीबी ही तयार करण्याची क्षमता पोलीसांमध्येच असते. म्हणूनच मुकेश चंद्राकरच्या मृत्यूबद्दल असे म्हणावे लागेल की, जेथे पत्रकार आहेत तेथे पत्रकारीता नाही आणि जेथे पत्रकारीता आहे तेथे पत्रकार नाहीत. छोट्या-छोट्या गावांमध्ये, राज्याच्या मुख्यालयापासून दुर राहणाऱ्या पत्रकारांना जीवाचा धोका कायम आहे. हे या घटनेवरून दिसते. खरे तर त्या पोलीस परिक्षेत्राच्या पोलीस महानिरिक्षकांचे धन्यवाद देणे आवश्यक आहे. ज्यांच्या आदेशानेच तो रहस्यमय सेफ्टीक टॅंक फोडण्यात आला आणि मुकेश चंद्राकरचा मृतदेह सापडला.